परभणीच्या शेवडी-कुऱ्हाडी 12.5 किमीच्या रस्त्यावरआठ महिन्यापासून डांबरीकरण होईना
परभणी/जिंतूर (Parbhani BBM road) : तालुक्यातील शेवडी फाटा ते कुऱ्हाडी दरम्यानच्या 12.5 किमीच्या रस्त्याची प्रचंड दुर्दशा झाल्याने आठ महिन्याखाली रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. परंतु आठ महिन्यापासून टाकण्यात आलेल्या बीबीएम रस्त्यावर अद्यापपर्यंत डांबरीकरण न झाल्यामुळे आहे त्या रस्त्यावर (Parbhani BBM road) खड्ड्यांची साम्राज्य पसरले आहे. शिवाय 12 पुलांवर सोडण्यात आलेल्या रस्त्याचीही अत्यंत दुरवस्था झाली आहे. परिणामी खड्ड्यांमुळे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना नाहक मरण यातना सहन कराव्या लागत असल्याचे चित्र आहे.
12 पुलावर सोडलेल्या रस्त्याची झाली अत्यंत दुरवस्था
देशाला गतिमान करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार दर्जेदार रस्ते बनवण्याकरिता अब्जावधी रुपयांचा निधी खर्च करीत आहे. परंतु शासनाकडून रस्त्यासाठी आलेल्या निधीचा वापर कंत्राटदार काही अधिकाऱ्यांशी संगनमत साधून स्वतःचे खिसे भरण्यासाठी करत असल्याचे विदारक चित्र आहे. कारण बहुतांश अंतर्गत ग्रामीण रस्ते कंत्राटदाराकडून निकृष्ट आणि दर्जाहीन बनवण्याचा विक्रम करत आहे. याचेच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे तालुक्यातील तालुक्यातील शेवडी फाटा ते कुऱ्हाडी दरम्यान असलेल्या 12.5 किमीच्या रस्त्याची अतिशय दुरवस्था झाल्याने सदरील रस्ता दुरुस्ती करण्याचे काम हाती घेण्यात आले.
मात्र 12.5 किमी मध्ये 7.8 किमीच्याच (Parbhani BBM road) रस्त्याचे बीबीएम करण्यात आले आहे. उर्वरित 4.8 रस्ता तसाच सोडून देण्यात आला आहे. यामध्ये सुरुवातीस 1.7 किमीचे बीबीएम करण्यात आले आहे. त्यानंतर 1.7 ते 4.3 पर्यंतचा रस्ता सोडून देण्यात आला आहे. तर 4.3 ते 5.3 किमी म्हणजे 1 किमीचे बीबीएम करण्यात आले व 5.3 ते 6.0 रास्ता रिकामाच आहे तर 6.0 ते 9.3 इतक्या रस्त्यावर बीबीएम टाकण्यात आले आहे तर 9.3 ते 10.8 रास्ता सोडला आहे व शेवटी 10.8 ते 12.6 रस्त्यावर बीबीएम केलेले आहे.
त्यातच सदरील रस्त्यामध्ये एकूण 12 पुले आहेत आणि पुलांवर रस्ता सोडण्यात आलेला आहे. आणि हे (Parbhani BBM road) रास्ता बीबीएमचे काम जवळपास आठ महिन्याचा कालावधी ओलांडला आहे तरीही रस्त्यावर डांबरीकरण न झाल्यामुळे आहे त्या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठ्या खड्ड्यांची साम्राज्य पसरले आहे आणि पुलावर सोडलेल्या रस्त्यांची तर अत्यंत दैना झाली आहे. परिणामी सदर रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना व प्रवाश्यांना तसेच शाळकरी विद्यार्थ्यांना खड्ड्यामुळे नाहक मरण यातना सहन कराव्या लागत आहे. परंतु याकडे लक्ष देण्याकरिता संबंधित विभागाकडे वेळ नसल्यामुळे मागील आठ महिन्यापासून सदरील (Parbhani BBM road) रस्ता डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. मात्र ही प्रतीक्षा कधी पूर्ण होईल आणि रस्त्याचे भाग्य कधी उजळेल हे तर कंत्राटदार व संबंधित विभागच जाणे.
