Yawatmal Reymond Compony :- शहरातील एमआयडीसी परिसरात असलेल्या रेमंड कंपनीमधील कर्मचार्यांचा अॅग्रिमेंटचा (Agreement) प्रश्न न्यायालयात आहे. २०२० मध्ये कामगारांचा वेतन करार ७२५० झाला. त्यानंतर त्यानंतरचा अॅग्रिमेंटचा प्रश्न न्यायालयात (Courts) गेला. त्या प्रश्नावरून सोमवारी रेमंड कंपनीत सायंकाळी चांगलाच चिघळला. त्यामुळे सोमवारी रेमंड कंपनीतील कर्मचार्यांनी कामबंद आंदोलन पुकारले होते.
यावेळी या परीसरात तगडा पोलिस बंदोबस्त (Police arrangement) तैनात करण्यात आला होता. रेमंडच्या जुन्या नव्या संघटनेत याठिकाणी रेमंड कर्मचार्यांमध्ये चांगलाच वाद झाला. त्यामुळे पोलिसांना पाचारण करण्यात आले होते. याठिकाणी जवळ पास ३०० ते ४०० कर्मचारी एकत्र आले होते.




