डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी हिंगोली चे कर्मचारी आक्रमक
हिंगोली (Employees Protest) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी हिंगोली च्या कर्मचाऱ्यांच्या वतीने पगार वाढीच्या संदर्भात 14 फेब्रुवारीला समाज कल्याण कार्यालया बाहेर बसून काम बंद आंदोलन (Employees Protest) करण्यात आले.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे आस्था-2, बाह्यस्रोत 1200 कर्मचारी कार्यरत असून गेल्या दहा वर्षांपासून एक रुपयाची ही पगारवाढ मिळालेली नाही, अनेक वेळा राज्याचे मंत्री व बार्टीचे महासंचालक यांना निवेदने देऊनही, आंदोलन, मोर्चा, बार्टी पुणे ते मुंबई मंत्रालय लॉंग मार्च पायी चालूनही आश्वासना पलीकडे अद्याप काहीच मिळाले नसल्याने बार्टीचे 1200 बाह्य स्रोत सर्व विभागाचे कर्मचारी दिनांक 13 फेब्रुवारी पासून पुणे बार्टी मुख्यालयासमोर (Employees Protest) काम बंद आंदोलन सुरु आहे.
महासंचालकांनी या बाबीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून किमान वेतन नुसार पगार वाढी (Employees Protest) संदर्भातील प्रश्न लवकर मार्गी लावण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पार्टी पुणे महासंचालक यांना समाज कल्याण सहाय्यक आयुक्त कार्यालय हिंगोली सहाय्यक आयुक्त यांच्यामार्फत पाठवलेल्या निवेदनावर बार्टी प्रकल्प अधिकारी व समता दूत सुरेश पठाडे, शंकर पोघे, सुनिता आवटे, संगीता खांदळे, मिलिंद आळणे, रवी कोळी, रहीम कुरेशी, संदीप घनतोडे ,गुरुनाथ गाडेकर, तुकाराम बगाटे, बालाजी कटारे, गजानन राठोड, गजानन अंभोरे, अभिजीत कांबळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.