कौशल्य केंद्राचे थाटात उद्घाटन
मानोरा (Employment and Skill development) : मासूपा महाविद्यालयात कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाद्वारे आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे थाटात उद्घाटन पार पडले. केंद्र सरकारच्या (Employment and Skill development) रोजगार व कौशल्य विकासांतर्गत येणाऱ्या विविध योजना पैकी मा. सु. पा. महाविद्यालयात आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे अधिकृत रित्या उद्घाटन करण्यात आले. हे उद्घाटन दूरदृष्टय प्रणाली द्वारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले.
या उद्घाटन समारंभाला महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल डॉ. सी.पी. राधाकृष्णन, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार उपस्थित होते. या समारंभ कार्यक्रमाला स्थानिक पातळीवरील ज्ञानोपासक शिक्षण प्रसारक संस्था मानोराचे अध्यक्ष अरविंद पाटील इंगोले, सचिव महादेवराव ठाकरे उपस्थित होते. या समारंभाच्या निमित्ताने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एस. ठाकरे यांनी महाविद्यालयात (Employment and Skill development) रोजगार व कौशल्य विकासावर आधारित पाच नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहे, याबाबतची माहिती दिली.
महाविद्यालयात सुरू करण्यात आलेल्या या आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे संयोजक म्हणून प्राध्यापक प्रशांत कांबळे काम पाहत आहे. योजने अंतर्गत महाविद्यालयामध्ये डायबेट्स, एज्युकेटर, रिटेल फार्मसी, मॅनेजमेंट , फ्रंट ऑफिस असिस्टंट , होम हेल्थ एड आणि मोबाईल फोन हार्डवेअर रिपेअर टेक्निशियन अल्प मुदतीचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम विनामूल्य शिकविल्या जाणार आहे. या (Employment and Skill development) योजने अंतर्गत १८ ते ४५ वयोगटातील कुठलाही व्यक्ती शैक्षणिक अहर्तेनुसार प्रवेश घेऊ शकतो व कौशल्य प्राप्त करू शकतो, असे मार्गदर्शनही विद्यार्थ्याना करण्यात आले.