ग्रा. प. सदस्य यांची बिडीओ कडे तक्रार
देशोन्नती वृत्तसंकलन
चिखली/बुलढाणा (Employment officer) : बोरगांव वसु ते आन्वी येथील पादंन रस्त्यावर कागदोपत्री मजुर दाखवून रोजगार सेवक समाधान फुलसिंग सुरडकर यांनी ६० हजार रुपये हडपले, अशी तक्रार ग्रा.प. सदस्य हरशिंग छररे यांनी गटविकास अधिकारी चिखली याच्याकडे केली आहे.
चिखली गटविकास अधिकारी यांना दिलेल्या तक्रारी मध्ये नमूद केले आहे की, रोजगार हमी योजनेच्या (Rojgar Hami Yojana) नावाखाली काही ठिकाणी यंत्राने कामे केली जातात तर काही कामावर मजूर न लावता दररोजचे बोगस मस्टर तयार करून दुसऱ्यांच्या नावावर कमिशन देवुन लाखों रुपयांची बिले काढली जात आहे. असाच एक प्रकार बोरगाव येथील ग्रा.प. सदस्य हरशींग छर्रे यांनी उघडकीस आनला. रोजगार सेवक समाधान फुलसिंग सुरडकर यांनी बोरगांव वसु ते आन्वी येथील पादंन रस्त्यावर कोणत्याही प्रकारचे मजूर लावले नाही आणि मस्टरवर कागदोपत्री मजुर दाखवून ६० हजार रुपयाची बिले हडपले.
विशेष म्हणजे रोजगार हमी योजनेची (Rojgar Hami Yojana) कामे ही, मजुरांकडून करायची असतात मात्र संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांमुळे ही कामे कागदोपत्री केली जात आहे. त्यामुळे गटविकास अधिकारी यांना तात्काळ दखल घेवुन कामाची चौकशी करावी आणि बोगस मस्टर तयार करून हजारो रुपयाची शासनाची फसवणूक केल्याची कार्यवाही करावी असे तक्रारीत नमूद केले आहे.