बारव्हा/भंडारा (laborer Death) : रोजगार हमीच्या (Employment yojana) कामावर एका काम करीत असलेल्या मजुराचा हृदय विकाराने मृत्यू (laborer Death) झाल्याची घटना आज सकाळी १० चे सुमारास लाखांदूर तालुक्यातील (Lakhandur taluka) सोनेगाव येथे घडली. रामचंद्र सखाराम ब्राम्हणकर (५८) सोनेगाव, ता. लाखांदूर जि. भंडारा असे मृतक इसमाचे नाव आहे.
लाखांदूर तालुक्यातील सोनेगाव येथील घटना
उन्हाळ्याच्या दिवसात मजुरांचे हाताला काम मिळत नसल्याने शासनाकडून प्रत्येक गावात (Employment yojana) रोजगार हमी योजनेचे काम धुमधडाक्यात सुरु आहे. सोनेगाव येथे गेल्या पंधरा दिवसांपासून महाराष्ट्र ग्रामीण रोजगार योजने अंतर्गत रोजगार हमीचे काम जोमात सुरु आहे. घटनेच्या दिवशी सर्व मजूर कामात व्यस्थ असताना काम करता करता रामचंद्र ब्राम्हणकर या इसमास भोवळ (Lakhandur taluka) येऊन खाली पडला. लागलीच इतर मजूर व रोजगार सेवक धावून गेले व तपासले असता रामचंद्र ब्राम्हणकर या इसमाचे मृत्यू झाल्याचे लक्षात आले. मृतकाच्या मृत्यूपश्चात पत्नी, दोन मुले, मुली, नातू असा आप्त परिवार असून घरची परिस्थिती हलाकीची आहे. शासनाने तात्काळ मदत करून मृतकाचे कुटुंबास मदत करावी, अशी मागणी रोजगार हमीचे कामावरील मजुरांकडून करण्यात येत आहे.