हिंगोली (Encroachment ) : शहरामध्ये रस्ते अरूंद झाले असताना अनेक ठिकाणी व्यवसायीकांनी अतिक्रमण (Encroachment) केल्यामुळे रस्तेही वाहतुकीस कमी पडु लागले. त्यामुळे नगर परिषदेच्या अतिक्रमण हटाव विरोधी पथकाने २ मे रोजी शहराच्या बाजारपेठमधील अतिक्रमण (Hingoli Police) पोलिस बंदोबस्तात हटविले.
व्यवसाय थाटल्याने अपघाताच्या घटना
हिंगोली शहरात (Hingoli City) कोट्यावधी रुपये खर्चातून नवीन रस्ते तयार करण्यात आले आहेत. परंतु काही व्यवसायीकांनी रस्त्यावर अतिक्रमण करून व्यवसाय थाटल्याने अपघाताच्या घटना घडु लागल्या. त्यामुळे मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांच्या उपस्थितीत गुरुवारी इंदिरा गांधी चौकातून (Encroachment campaign) अतिक्रमण हटाव मोहिमेस पोलिस बंदोबस्तात सुरूवात करण्यात आली. यावेळी पथकाने जेसीबीच्या माध्यमातून माणका कॉम्प्लेक्स, बुरूड गल्ली, हरण चौक, गोदावरी हॉटेल, शिवधनुष्य चौक, फुल मंडी, अनाज मंडी, घडवाई हनुमान मंदिर परिसरातील अतिक्रमण हटविले.
अनेकांनी स्वत:हुन अतिक्रमण काढले
विशेष म्हणजे, नगर पालिकेने अचानक अतिक्रमण हटाव मोहिम सुरू केल्याने काही व्यवसायीकांची धावपळ झाली. त्यामुळे माजी नगराध्यक्ष हाजी निहालभैय्या यांनी व्यापार्यांना आवाहन केल्याने अनेकांनी स्वत:हुन अतिक्रमण काढुन घेतले. या मोहिमेत नगर अभियंता रत्नाकर अडशिरे, स्वच्छता निरीक्षक बाळु बांगर, शाम माळवटकर आदी कर्मचारी सहभागी झाले होते. (Encroachment campaign) अतिक्रमण हटविल्याने रस्ते खुले झाले. ही मोहिम सुरूच राहणार असल्याची माहिती मुख्याधिकारी मुंढे यांनी दिली.