कळमनुरी (Encroachment) : कळमनुरी शहरात नगर पालिका प्रशासनाने (Municipal Administration) दि. २ मे गुरुवारपासून अतिक्रमण हटावो मोहिम (Encroachment) हाती घेतली. परंतु अतिक्रमण काढण्याची सुचना दि.३० एप्रिल रोजी पालिका प्रशासनाने दिल्यानंतर अतिक्रमण धारकांनी दि १ मे रोजी रात्री उशिरापर्यंत स्वयंफुर्तीने काढून घेतल्याचे पाहवयास मिळाले. अतिक्रमणे हटविण्यात आल्यायामुळे शहरातील अरुंद रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे.
कळमनुरी शहरातील (Kalmanuri city) हिंगोली-नांदेड या मुख्यरस्तावर रस्ता रुंदीकरण व सुशोभीकरण करण्याचे काम सुरू झाले. या कामात (Encroachment) अतिक्रमणाचा अडथळा निर्माण होत असल्याने व शहरातील जुने पोलीस स्टेशन ते पोस्ट ऑफिस परिसरात बहुतांश ठिकाणी व्यापाऱ्यांनी दुकानातील साहित्य बाहेर रस्त्यालगत ठेवले होते. काही व्यापाऱ्यांनी चक्क दुकानांवर टीनपत्रांची झापडी लाऊन दुकानासाठी मोठी जागा करून घेतली आहे. यामुळे शहरातील रस्ते अरूंद झाले होते अरुंद रस्त्यांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. शिवाय नाले सफाई करण्यासाठी ही अडचण येत असल्याने नगर पालिका प्रशासनाने दि. ३० एप्रिल रोजी दि. १ मे पर्यंत शहरातील अतिक्रमण धारकांना (Encroachment) अतिक्रमण काढण्याची डेडलाईन दिली होती.
या पार्श्वभूमीवर अतिक्रमण (Encroachment) धारकांनी जवळपास सर्वच अतिक्रमण हे दि.१ मे च्या रात्री उशिरापर्यंत स्वयंफुर्तीने काढून घेतल्याचे चित्र पाहवयास मिळाले. दि.२ मे रोजी पालिका प्रशासनाने (Kalmanuri Police) पोलीस बंदोबस्त मधे अतिक्रमण काढण्यास सुरवात केली. या वेळी नगर पालिकेचे मुख्याधिकारी रविराज दरक, कार्यालयीन अधीक्षक नंदकिशोर डाखोरे, स्थापत्य अभियंता निकेत यरमळ, लिंबाजी कुंभारकर, म. नदीम, सुभाष काळे, मो.मगदूम, मनोज नकवाल, मो.मुख्तार,राजू साळवे, सुदर्शन तावडे, विनायक गाडेकर, मोहनिश वाढवे, संतोषकुमार साळवे, यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.