हिंगोली(Hingoli) :- शहरातील रिसालानाका ते गणेशवाडी मारोती मंदिरापर्यंत सिमेंट रस्त्याचे काम केले जात आहे. काहींचे पक्के अतिक्रमण (Encroachment) असल्याने १० ऑगस्ट शनिवार रोजी जेसीबीद्वारे अतिक्रमण पाडण्यात आले.
रिसालानाका ते गणेशवाडी मारोती मंदिरापर्यंत विकासाचे काम
सिमेंट रस्त्याचे (Cement Road) काम नगर परिषदेद्वारे केले जात असताना काहींचे अतिक्रमण होते. त्यांना अतिक्रमण काढण्याच्या सूचना देऊन सुद्धा काहींनी अतिक्रमण काढले नाही. १० ऑगस्टला मुख्याधिकारी अरविंद मुंढे यांच्या नेतृत्वाखाली जेसीबीच्या (JCB)माध्यमातून काही पक्क्या घरांचे अतिक्रमण पाडण्यात आले. यावेळी नगर अभियंता रत्नाकर अडशिरे, स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर, अभियंता प्रतिक नाईक, किशोर काकडे, वसंत पुतळे, लेखापाल अनिकेत नाईक, अग्नीशामक प्रमुख धायतडक, विक्रांत राठोड, शाम माळवटकर, संदीप घुगे, विनय साहू, स्नेहल आवटे, दिनेश वर्मा, विजय शिखरे, वैâलास थिट्टे, देवीसिंग ठाकुर, माधव सुक्ते, आनंद दायमा यासह स्वच्छता विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.