हिंगोली(Hingoli):- मध्यंतरी वसमत शहरात अतिक्रमण (Encroachment) हटाव मोहीम राबविली. आता ९ जानेवारी रोजी हिंगोली शहरातही अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली. विशेष म्हणजे या मोहिमेसाठी पोलिसांनी पुढाकार घेऊन अनेक अतिक्रमण धारकांचे साहित्य नगर परिषदेच्या (City Council)माध्यमातून जप्त केले.
हिंगोली नगरपरिषद तर्फेही राबविली जाणार मोहीम
हिंगोली शहरामध्ये नगर परिषदेच्या माध्यमातून मोठे सिमेंट रस्ते तयार करण्यात आले. रस्ते मोठे झाले असले तरी अनेक व्यावसायिकांनी रस्त्यावर अतिक्रमण करून जागा व्यापली होती. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन पोलिसांकडे वारंवार तक्रारी होत होत्या. त्यामुळे पोलीस निरीक्षक नरेंद्र पाडळकर यांनी ९ जानेवारी रोजी महात्मा गांधी चौकातून अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरूवात केली. ही मोहीम भाजी मंडईतही राबविण्यात आली. मोहिमेमध्ये अनेक व्यावसायिकांनी रस्त्यावर अतिक्रमण केले होते त्यांचे साहित्य नगर पालिकेच्या पथकामार्फत जप्त करण्यात आले. विशेष म्हणजे आता येत्या सोमवार पासून नगर परिषदेच्या माध्यमातून देखील शहरातील अतिक्रमण हटाव मोहिमेवर हातोडा पडणार असल्याचे विश्वसनीय सुत्रांकडून कळते.