जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांचे प्रतिपादन
हिंगोली (Collector Abhinav Goyal) : राष्ट्राच्या विकासात अभियंत्यांचा मोठा रोल असून शासकीय असो की खाजगी क्षेत्रात काम करीत असताना दूरदृष्टीकोण ठेवून नविन तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिनव गोयल (Collector Abhinav Goyal) यांनी बुधवारी १८ सप्टेंबरला अभियंता दिनी (Engineer’s Day) कार्यक्रमात बोलताना केले.
हिंगोली येथील जिल्हा परिषदेच्या षटकोनी सभागृहात बुधवारी १८ सप्टेंबर रोजी भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरया यांच्या जयंतीचे औचित्य साधून जिल्हा परिषदेच्या अभियंता संघटनेचा पुढाकारातून अभियंता दीन साजरा करतांना यावेळी गोयल बोलत होते. व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या सीईओ नेहा भोसले, अतिरीक्त सीईओ अनूप शेंगुलवार, अनंतकुमार कुंभार, नामदेव केंद्रे, संजय कुळकर्णी, अतुल साळुंके, कार्यकारी अभियंता प्रदीप मुळे, डी . डी.घुगे, जिल्हाध्यक्ष आनंद पतंगे,जिल्हा सचिव रा.ना.कुलकर्णी,कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा अतुल सोळंके आदिंची उपस्थिती होती.
रमेश सानप हे कारगिल सायकल यात्रा पूर्ण करून आल्याबद्दल त्यांचा जिल्हाधिकारी गोयल (Collector Abhinav Goyal) यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषद हिंगोली अंतर्गत सर्व उप अभियंते शिवाजी पद्मने,प्रियांका राजपूत,नरवाडे,कांचन उमाळे,सुनील मुटकुळे,विक्रम पत्की,तसेच नव्याने रुजू झालेले कनिष्ठ अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, कनिष्ठ आरे, सेवानिवृत्त अभियंता यांचा देखील सत्कार करण्यात आला. अभियंता प्रतिज्ञाचे वाचन संदेश जाधव यांनी केले.
जिल्हाधिकारी गोयल (Collector Abhinav Goyal) बोलतांना पुढे म्हणाले, जगभरात नवीन तंत्रज्ञान विकसित झाले असून, नव नवीन संकल्पना घेउन नवीन आयडीयालॉजीचा वापर करावा असे सांगून मॉनिटरिंग इनोव्हेटिव्ह काम करावे असे सांगीतले. याशिवाय हिमाचल प्रदेश येथे नवीन तंत्रज्ञाचा वापर करून अटल टणल बोगदा उभारला असल्याचे सांगून अनेक ठिकाणी कामे कशी करण्यात आल्याचे दाखले देऊन स्पष्ट केले. याशिवाय तलाव, धरणे आदीची उदाहरणे दिली. धुळे शहराचा विकास करण्यात मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या कौशल्याने विकास करण्यात आला असल्याचे सांगून अभियंत्यांनी विश्वेश्वरया यांची प्रेरणा घेउन दूरदृष्टीकोण ठेवून काम करण्याचा सल्ला दिला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कोषाध्यक्ष शामकांत पजई,कार्याध्यक्ष वसंत वीर,उपाधक्ष प्रमोद उबारे,संदेश जाधव,राजाराम चंदाले, आर एन सोनटक्के, संतोष बऱ्हाटे,शत्रुघ्न आव्हाड,रवी तीखे,रामेश्वर बोरकर, दासराव गिराम , नितीन कोकडवार,माधव दळवे,सुनील लोखंडे,विठ्ठल जाधव, निमदेव,अक्षय सुरवसे,सचिन कोकडवार,अर्चना कोटपेट,भोळे,शिंदे,लहाने, बेंडकें, नहारे,कनोडे, बोबडे,घायाळ,गायकवाड,सौ.नुने, मार्कड, गोटे, शेजुळ, धुळे, गंधारे, लढ्ढा, जटाले, बरोटे,नवघरे, झिंझडे,महाजन यांनी परिश्रम घेतले.
जी.प.च्या पाठीमागील भागात वृक्षारोपण
जिल्हा परिषदेच्या पाठीमागील भागात आज जिल्हाधिकारी अभिनव गोयल (Collector Abhinav Goyal) यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले, त्यांनतर संत निरंकारी मंडळाच्या वतीने याभागात मिया वाकी पद्धतीने वृक्षारोपण करून त्यांचे संगोपन करण्याचा निर्णय घेतला आहे
अभियंता संघटनेमार्फत सामाजिक उपक्रम
अभियंता संघटनेकडून (Engineer’s Day) वर्षभर विवीध सामाजिक उपक्रम राबविले जातात, यामध्ये रक्तदान शिबिर, नेत्रदान शिबीर, साई माऊली येथे अन्नदान, वृक्षारोपण केले जात असल्याचे जिल्हाध्यक्ष आनंद पतंगे यांनी सांगीतले. सूत्रसंचलन आणि आभार रा.ना. कुलकर्णी यांनी मानले.