हिंगोली (Hingoli) :- भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्र्वेश्र्वर्या यांच्या १६४ व्या जयंतीचे औचित्य साधून दरवर्षी अभियंता दीन जिल्हा परिषदेच्या अभियंता संघटनेचा पुढाकारातून साजरा केला जातो. त्यानूसार १८ सप्टेंबर रोजी येथील जिल्हा परिषदेच्या सभागृहात साजरा केला जाणार आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी अभिनव गोयल हे राहणार आहेत
अभियंता दिनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी अभिनव गोयल हे राहणार आहेत तर जिल्हा परिषदेच्या सीईओ नेहा भोसले यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. यावेळी अतिरीक्त सीईओ अनूप शेंगुलवार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अतुल साळुंके, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप मुळे, लघुसिंचन विभागाचे अभियंता के. के. घुगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंतकुमार कुंभार, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय कुळकर्णी, महीला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ यांची प्रमूख उपस्थिती राहणार आहे.
जिल्हा स्वतंत्र झाल्यानंतर तेंव्हापासून ते आजपर्यंत अभियंता दीन सातत्याने साजरा केला जातो
दरम्यान अभियंता संघटनेने परभणी (Parbhani)जिल्ह्यातून हिंगोली जिल्हा स्वतंत्र झाल्यानंतर तेंव्हापासून ते आजपर्यंत अभियंता दीन सातत्याने साजरा केला जातो. विशेष म्हणजे अभियंता संघटनेकडून वृक्षारोपण , आरोग्य शिबीर याबरोबरच गरजू मुलांना दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाचा खर्च देखील संघटनेच्या माध्यमातून केला जातो. अभियंता संघटनेने जिल्हाध्यक्ष आनंद पतंगे, रा. ना. कुळकर्णी, शामकांत पजई, वसंत वीर, दत्तात्रय मस्के, राजाराम चंदाले, सोमेश्वर गीते, बारी खान, प्रमोद उबारे, संतोष बाराते, यांच्यासह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अभियंता दिनाची जोरदार तयारी चालविली आहे.