मानोरा (Congress problem dindi) : तालुक्यातील श्रीक्षेत्र आसोला खुर्द येथील भगवान शिव शंकराचे परम भक्त महान तपस्वी परमहंस श्री सोहंमनाथ महाराज यांचे दर्शन घेवून कॉग्रेसच्या दि. ९ ऑगस्टपासून काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा जिल्हा प्रभारी देवानंद पवार यांच्या नेतृत्वात सुरूवात झालेल्या समस्या (Congress dindi) शोध दिंडीला गावागावातून उस्फुर्त प्रतिसाद मिळत असुन या दिंडीत शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार , महीला भगिनी व विद्यार्थी सहभागी होवून आपल्या समस्या मांडताना दिसून येत आहेत.
मतदार संघात तब्बल एक महिनाभर चालणाऱ्या समस्या शोध दिंडीच्या माध्यमातून देवठाणा, कारपा, शेंदूरजना आढाव, गोस्ता, रुई, वटफळ, मेंद्रा, फुलउमरी, उमरी खुर्द, सोमेश्वरनगर, गव्हा, कोलार, पाळोदी गावात दिंडीचे आगमन होताच गावकरी मंडळींनी दिंडीचे स्वागत करून सत्कार केला. लोक प्रतिनिधींकडून पाच वर्षांच्या कालावधीत ज्या ज्या समस्या सुटलेल्या नाहीत, ते एकूण घेत गावातील समस्यांची पाहणी करून जिल्हा प्रभारी देवानंद पवार ग्रामस्थांशी संवाद साधत आहेत. तसेच महागाई, बेरोजगारी, शेतकरी यांच्यावर केंद्रातील महायुर्मतीचे मोदी व राज्यातील शिंदे सरकारने केलेल्या कारनाम्याचा पाढा लोकांसमोर वाचत वाचला.
या दिंडीत मतदार संघातील (Congress dindi) वाशिम जिल्हा काँग्रेसचे वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्ष इफ्तेखार पटेल, जिल्हा सरचिटणीस निलेश कानक़ीरड, काँग्रेसचे पदाधिकारी संदेश जिंतूरकर, रामनाथ राठोड, कारंजा तालुका अध्यक्ष विजय देशमुख, शहर अध्यक्ष अमीर खान पठाण, मानोरा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अमोल तरोडकर, युवक कॉग्रेसचे अध्यक्ष महेश जाधव, शहर काँग्रेस अध्यक्ष हाफिज खान, गोपाल चिस्तळकर, महीला कॉग्रेसच्या तालुका अध्यक्ष नंदा तायडे, माजी नगराध्यक्ष बरखा अलताब बेग आदी कॉग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते कॉग्रेसच्या शोध समस्या दिंडीत सहभाग घेत आहेत.
काँग्रेसचे (Congress dindi) जिल्हा प्रभारी पवार केंद्रातील शेतकरी विरोधी महायुतीचे मोदी व राज्यातील शिंदे सरकार वर निशाणा साधत समस्याची पाहणी करून जाणून घेत आहेत. तसेच गावागावातील शेतकरी, विद्यार्थी, सुशिक्षित बेरोजगार, महीला भगिनी याच्याशी संवाद करत आगामी निवडणूकीत महाविकास आघाडीला साथ देण्याची विनंती करून काँग्रेसचे युवा नेता खा. राहूल गांधी, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे विचार घराघरात पोहोचविण्यासाठी दिंडीद्वारे आलो आहे, अशी बतावणी करत आहे.