जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते आरटीएस दक्षता व सनियंत्रण कक्ष, निवासी उपजिल्हाधिकारी यांचे कक्ष व त्यांच्या नूतनीकरण केलेल्या कार्यालयाचे उद्घाटन
हिंगोली (Hingoli RTS) : येथील जिल्हाधिकारी कार्यालयात लोकसेवा हक्क अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आरटीएस दक्षता व सनियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या (Hingoli RTS) कक्षाचे उद्घाटन आज जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. तसेच यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या कक्षाचे व महसूल विभागाच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या कार्यालयाचे उद्घाटनही जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी अपर जिल्हाधिकारी (Hingoli RTS) अनिल माचेवाड, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, जिल्हा नियोजन अधिकारी ग. गो. चितळे, तहसीलदार आश्विनकुमार माने यांच्यासह सर्व नायब तहसीलदार, सर्व कर्मचारी यांची उपस्थिती होती.
यावेळी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी आरटीएस दक्षता व सनियंत्रण कक्षामार्फत आपले सरकार सेवा केंद्र तसेच आरटीएसवर प्राप्त अर्जाचा नियमित आढावा घेऊन संबंधित विभागाकडून (Hingoli RTS) प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार असल्याची माहिती दिली. तसेच त्यांनी तसेच त्यांनी आरटीएस दक्षता व सनियंत्रण कक्ष, निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या कक्ष व महसूल विभागाच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या कार्यालयाची पाहणी करुन योग्य त्या सूचना केल्या.