गडचिरोली (Ganeshotsav Competition) : उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना राज्य सरकारकडून पुरस्कार देण्यासाठी ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा – २०२५’ सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत नोंदणी केलेल्या गडचिरोली येथील आरमोरी मार्गावरील सुमानंद सभागृहात प्रतिष्ठापणा केलेल्या गडचिरोलीचा राजा म्हणुन ओळखल्या जाणार्या लोकमान्य (Ganeshotsav Competition) गणेश मंडळाचे प्रशासकीय अधिकारी व पत्रकारांच्या चमुने आज ४ सप्टेंबर रोजी मुल्यांकन केले.
लोकमान्य गणेश मंडळाने शासनाच्या धोरणास अनुसरून विविध उपक्रम राबविले आहेत. या उपक्रमांची माहिती जाणुन घेण्यासाठी तसेच मुल्यांकन करण्याकरीता समितीने मंडळास भेट दिली. (Ganeshotsav Competition) गणेश मंडळाच्यावतीने राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती जाणुन घेतली. याप्रसंगी मंडळाच्यावतीने समिती पदाधिकार्यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी समितीचे अध्यक्ष नायब तहसीलदार ज्ञानेश्वर ठाकरे, विस्तार अधिकारी पाल,गडचिरोलीचे मंडळ अधिकारी सिडाम, पत्रकार दिगांबर जवादे, पत्रकार नरेश बावणे , नगरपरीषदेचे कर निरीक्षक बुक्कावार, तहसील कार्यालयातील सहाय्यक महसुल सहाय्यक लोणारे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी लोकमान्य गणेश मंडळाचे पदाधिकारी सुरज खोब्रागडे,शुभम दागमवार,विशाल हरडे,सागर सोरते,किशोर वैरागडे,आकाश खोब्रागडे, किरण नैताम, सागर हजारे, रत्नाकर नैताम,ओम खोब्रागडे तसेच पदाधिकारी उपस्थित होते.




