परभणी(Parbhani) :- जिल्ह्यात नविन शैक्षणिक वर्ष सुरू होऊन आता दिड महिना उलटला. तरीही विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वितरण अजूनही करण्यात आले नाही. त्यामूळे या योजनेचा फज्जा उडाल्याचे चित्र जिल्हाभर आहे. गणवेश न मिळाल्याने विद्यार्थ्यांना (Students)जुन्याच गणवेशावर शाळेत जावे लागत आहे.
समग्र शिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवसी मोफत गणवेश
शिक्षण विभागाच्या सुचनानूसार समग्र शिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवसी मोफत गणवेश (Uniform) पुरविणे आवश्यक आहे. मात्र जिल्ह्यात अजूनही विद्यार्थ्यांना गणवेश वितरण झाले नाहीत. स्वातंत्र्य दिन(independence day) १५ ऑगस्ट पर्यंत तरी विद्यार्थ्यांना गणवेश मिळेल का ? अशी विचारणा आता पालक, विद्यार्थ्यांतून होत आहे. जिल्ह्यात एकूण १ हजार १३१ शाळा आहेत. तर शिक्षण विभागाच्या माहितीनूसार जिल्ह्यात १ लाख ३४ हजार ५४० पेक्षाही अधिक विद्यार्थी इयत्ता १ ली ते ८ वीत शिक्षण घेत आहेत. यामध्ये ५७ हजार पेक्षा अधिक मुली तर ६१ हजारांपेक्षा अधिक मुलांची संख्या आहे. वर्ग १ ली ते ८ वीच्या विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियानातून प्रत्येकी दोन गणवेश वितरीत करावयाची आहेत. यामध्ये परभणी तालुक्यात ४५ हजार ९४१, गंगाखेड तालुक्यात १२ हजार ५७६, जिंतूर तालुक्यात १८ हजार ७२८, मानवत तालुक्यात ७ हजार ३२७, पालम तालुक्यात ७ हजार १४७, पाथरी तालुक्यात १२ हजार ६१७, पुर्णा तालुक्यात १२ हजार ४३, सेलू तालुक्यात ११ हजार ७९७ आणि सोनपेठ तालुक्यात ५ हजार ९५१ असे मिळून एकूण १ लाख ३४ हजार ५४० एवढे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सर्व शिक्षा अभियानांतर्गत इयत्ता १ ली ते ८ वी च्या विद्यार्थ्यांना दोन गणवेश, बुट व पायमोजे आदींचे मोफत वितरण करण्यात येणार आहे. राज्यस्तरावरून एक गणवेश विद्यार्थ्यांना मिळणार आहे. तर दुसरा गणवेश स्थानिक स्तरावर महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून शिवून दिला जाणार आहे.