परभणी(Parbhani) :- थकीत वीज देयकासाठी महावितरणने बुधवार १५ मे रोजी परभणी शहराच्या पाणी पुरवठ्याची वीज तोडली. शुक्रवार १७ मे रोजी शहर महापालिकेने (Municipal Corporation) थकीत देयकापोटी २२ लाख रुपये महावितरणला(Maha distribution) अदा केले. तरी देखील वीज पुरवठा सुरळीत करण्यात आलेला नाही. ऐन उन्हाळ्यात पाणी पुरवठा खंडित झाल्याने नागरीकांना निर्जळीचा सामना करावा लागत आहे. टँकरच्या सहाय्याने पाणी आणण्याची वेळ आली आहे.
महावितरणमध्ये पाणी पुरवठ्याच्या थकीत देयकावरुन नेहमीच वाद होत आहेत
परभणी शहर महापालिका आणि महावितरणमध्ये पाणी पुरवठ्याच्या थकीत देयकावरुन नेहमीच वाद होत आहेत. देयक थकले की महावितरणकडून वीज पुरवठा खंडित (Power supply interrupted) केला जात आहे. शहर महापालिकेकडे जवळपास आठ कोटी रुपयांची थकबाकी आहे. या रक्कमेसाठी महावितरणने महापालिकेला पत्र दिले होते. देयक न दिल्याने १५ मे रोजी येलदरी, धर्मापुरी येथील वीज तोडण्यात आली. राहटी येथील केंद्रावरील वीज सुरू असल्याने ममता कॉलनी, राजगोपालाचारी उद्यान, औद्योगिक वसाहत परिसर या भागातील जलकुंभाला पाणी होत आहे. तर उर्वरित शहरातील पाणी पुरवठा बंद आहे. वीज जोडणी सुरू करण्यासाठी महापालिकेने शुक्रवार १७ मे रोजी २२ लाखाचे देयक भरले आहे. महावितरणने उर्वरित थकबाकी द्यावी अशी मागणी महापालिकेच्या पाणी पुरवठ्याचा वीज पुरवठा सुरळीत केलेला नाही. या विषयी महावितरणची प्रतिक्रिया जाणुन घेण्यासाठी अधिक्षक अभियंत्यांना संपर्क केला असता त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. महावितरण आणि महापालिकेच्या वादात शहरवासीयांवर मात्र निर्जळीची वेळ आली आहे.