परभणी (Parbhani):- मैत्रिणिसोबत देवदर्शनानंतर अॅटोने परत येत असताना बेलखेडा पाटीजवळ या महिलेसोबत सामुहिक अत्याचार (torture) करण्यात आला. ही घटना २२ जून रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी ४ आरोपींवर बामणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
व्यक्तीची अश्लील भाषेत शिवीगाळ
पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, २२ जून रोजी सायंकाळी सातच्या सुमारास पीडिता ही मैत्रिणीसोबत वझर येथे देवदर्शनासाठी गेली होती. अॅटोने परत येत असताना रात्री ९ च्या सुमारास बेलखेडा पाटीजवळ तहान लागल्याने अॅटो चालकाला पाणी बॉटल (water bottle)आणायला लावली. एका दुकानातून पुंजा मते बाहेर आला. त्याने पीडितेच्या मैत्रिणिच्या तोंडावर मोबाईल (Mobile) बॅटरीने उजेड मारला. यावेळी महिलांनी सदर इसमास विरोध केला असता त्या व्यक्तीने अश्लील भाषेत शिवीगाळ (Abuse in obscene language)करत तुम्ही इतक्या रात्री का आलात, थांबा पोर घेऊन येतो, असे म्हणून निघून गेला. थोड्या वेळ्याने पुंजा मते इतर तिघांना घेऊन आला. एकाने पीडितेचा हात धरत तिला रस्त्याच्या बाजुला झुडपामध्ये नेले. बळजबरीने अत्याचार केला. इतरांनीही महिलेवर बळजबरी केली. सदर प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून भगवान मते, योगेश मते, ओमा घोलमे, पुंजा मते यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे.
प्रकरण मिटविण्यासाठी केला फोन
घटना घडल्यानंतर २३ जूनला भगवान मते यांने पीडितेच्या मोबाईलवर फोन करून घटनेबाबत विचारपूस करत प्रकरण मिटवून घेण्याबाबत सांगितले. यावर पीडितेने माझी तब्येत बरोबर नसून मला दवाखान्यात जायचे आहे. असे सांगितले. तेव्हा वझर येथील तिन व्यक्तींनी पीडितेच्या फोन पे वर पंधराशे रुपये पाठविले, असे तक्रारीत पीडितेने नमूद केले आहे.