बुलडाणा (Reservation rescue yatra) : वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर (Adv. Balasaheb Ambedkar) यांनी महाराष्ट्रामध्ये ओबीसी, एससी, एसटी आरक्षण बचाव यात्राचे (Reservation rescue yatra) नियोजन केले होते त्याच धर्तीवर तीलुक्यातील प्रत्येक गावात व शहरातील प्रत्येक वार्ड मध्ये आरक्षण बचाव यात्रेचे तात्काळ नियोजन करुन तालुक्यातील प्रत्येक गावात तसेच शहरातील प्रत्येक वार्डमध्ये ही आरक्षण बचाव यात्राचे नियोजन करा अशा सुचना वंचितचे जिल्हाध्यक्ष निलेश जाधव यांनी जिल्हा बैठकीत तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष यांना दिले.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी खंडाळा ता.पुणे येथील बैठकीत दिलेलेल्या सुचना नुसार सदर बैठीकेचे नियोजन वंचितचे जिल्हाध्यक्ष निलेश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली विश्रामगृह बुलडाणा येथे काल दिनांक २५ रोजी सम्पन्न झाली. सदर बैठकी मध्ये आरक्षण बचाव यात्रा (Reservation rescue yatra) ही तालुक्यातील प्रत्येक पंचायत समिती सर्कल निहाय गाव पातळींवर यात्रा घेऊन जाण्याचे नियोजन करणे. या यात्रेसाठी तिनं समित्यांचे नियोजन करणे.शहरातील प्रत्येक वार्डनिहाय यात्रेचे नियोजन करणे. पंचायत समीती सर्कल निहाय व शहरातील वार्ड निहाय दौ-यांचे पॅम्लेट तत्काळ छापून प्रत्येक गावामध्ये व शहरातील प्रत्येक वार्ड मध्ये ती पत्रक वाटप करणे.
पंचायत समीती, जिल्हापरीषद, नगरपालीका च्या निवडणुकीसाठी उमेदवारांचे अर्ज घेणे. ओबीसी निवडणुक समन्वय समिती गठीत करणे यासह विवीध विषयावर चर्चा झाली. सदर बैठकीला वंचितचे जिल्हाध्यक्ष निलेश जाधव, महासचिव प्रशांत वाघोदे, विष्णु उबाळे यांनी या बैठकीमध्ये मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष भिमराव शिरसाठ, महीला जिल्हाध्यक्ष अलकाताई जायभाये, विद्याधर गवई, सम्यकचे जिल्हाध्यक्ष मोहीत दामोदर, तालुकाध्यक्ष समाधान डोंगरे, मनोज खरात, संजय धुरंधर, शहाराध्यक्ष मिलींद वानखेडे, ॲड. बबन वानखेडे, बळी मोरे, मिलींद मघाळे, संजय जाधव, विजय राऊत, दिलीप राजभोज, शेषराव उमाळे यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थीत होते.