Hingoli:- हिंगोली नगर परिषदे मार्फत हिंगोली शहरातील नागरिकांचे आरोग्य हे सुदृढ राहावे या करिता मुख्याधिकारी अरविंद मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक योग दिनाच्या अनुषंगाने 21 जून रोजी माझी वसुंधरा अभियान व स्वच्छ भारत अभियान अंतर्गत हिंगोली नगरपरिषद हिंगोली, योगविद्याधाम व राजूरी स्टील उद्योग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक योगदिनाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन शहरातील गणेश ईन येथे करण्यात आले होते.
रक्त तुटवड्यामुळे शिबिरात 109 दात्यांचे रक्तदान
रक्तदान शिबिराचे उद्घाटन मुख्याधिकारी अरविंद मुंढे यांच्या हस्ते करण्यात आले. सदर रक्तदान शिबिरास (Blood donation camp) रक्तदात्यांचा व स्वच्छता विभागातील(Sanitation Department) स्वच्छता कर्मचारी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून यामध्ये 109 रक्तदात्यांनी रक्तदान केले व खऱ्या अर्थाने मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांनी नागरिकांना केलेल्या आवाहनाला रक्तदान हे श्रेष्ठदान आहे हे आज प्रतिसाद देऊन खरे सिद्ध केले. प्रसारमाध्यमाद्वारे रक्तसाठा कमी असले बाबत व अत्यंत गरज असले बाबत कळताच मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांनी लगेच नगर परिषद अधिकारी व कर्मचारी यांना आदेशित करून जागतिक योग दिनाच्या (World Yoga Day) अनुषंगाने भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्याचे निर्देशित केले व रक्तदान करणाऱ्या नागरिकांना प्रोत्साहनपर भेटवस्तू देणेबाबत सुचविले जेणेकरून नागरिक मोठ्या संख्येने सदर उपक्रमास प्रतिसाद देतील.
या अनुषंगाने नगर परिषद हिंगोली, योग विद्याधाम आणि राजुरी स्टील यांच्या संयुक्त विद्यमाने सदर रक्तदान शिबीर आयोजित करून रक्तदान करणाऱ्या नागरिकांना प्रोत्साहनपर भेटवस्तू म्हणून सन गॉगल, डीओ व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच रक्तसंकलन (Blood collection) करणेसाठी शासकीय रुग्णालय रक्तकेंद्र येथील कर्मचारी डॉ. दीपमाला पाटील, विवेक गिरी, संतोष ठाकरे, बंडू नरवाडे,विद्या नौर,नितीन हांडगे ई. कर्मचारी यांनी सहकार्य केले. यावेळी उपमुख्याधिकारी उमेश हेंबाडे, प्रशासकीय अधिकारी श्याम माळवटकर, नगर अभियंता रत्नाकर आडसिरे, इंजि. अनिकेत नाईक,स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर, देविसिंग ठाकूर, संदिप घुगे, आशिष रणशिंगे, अभियंता पुतळे, अभियंता काकडे, पंडित मस्के,अशोक गवळी,अनिकेत नाईक,उत्तम जाधव,धायतडक,विनय शाहू,मनोज बुरसे,वर्धमान सोनटक्के,दिनेश वर्मा,माधव सुकते,विजय शिखरे,आकाश गायकवाड,दिनकर शिंदे,रवी गायकवाड,चेतन भूजवने ,शे. साजिद,एजाज पठाण,संघपाल नरवाडे यांच्या सह, योगविद्या धामचे सुभाष तापडिया सौ. तापडिया, मनमोहन सोनी, हनुमान केडिया, प्रा.संजय अग्रवाल, ज्ञानबा मुसळे, दत्तराव गीते, आदींची उपस्थिती होती.