माहूर(mahoor/Nanded):- लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानास आज दि २६ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता सुरूवात झाली माहूर तालुक्यातील मौजे टाकळी येथील बुथ क्रमांक ५ वर सकाळी ७ वाजून १० मिनिटाला सुरूवातीचे १ मतदान झाल्या नंतर ई.व्ही.एम मशिन बंद (EVM machine off)पडल्याने मतदाराचा हिरमोड झाला तर बरेच मतदार हे आपापल्या कामाला निघून गेल्याचे सांगण्यात आले आहे.
हिंगोली लोकसभा (hingoli Loksabha election) १५ येथील मतदान आज २६ एप्रिल रोजी होत आहे सकाळी ७ ते सायं ६ वाजेपर्यंत मतदानाची वेळ निवडणूक आयोगाने (Election Commission) दिलेली आहे आज लोकशाही उत्सव व विवाहाचे तिथी मोठ्या असल्याने अनेक गावात लग्न समारंभ चे कार्यक्रम व उन्हाचा चढता परा लक्षात घेता अशा धावपळीत मतदानाचा हक्क बजावने अधीकर्तव्य असल्याने नागरिकांनी सकाळीच मतदान केंद्रावर मतदानचा हक्क बजावण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दर्शवली. परंतु माहुर तालुक्यातील मौजे टाकळी येथे सकाळ चे ७ वाजून १० मिनिटाला पहिले मतदान झाले त्यानंतर ईव्हीएम मशीन (EVM machine) मध्ये बिघाड झाल्याने मतदान प्रक्रिया खोळंबल्याने ई.व्ही.एम मशीनचा संच बदलण्यात आली मतदान ८ वाजून ५० मी पुन्हा सुरळीत सुरूवात झाली मशिन संच बदलण्यास व मतदान प्रक्रिया सुरळीत करण्यास तब्बल १ तास ४० मी चा वेळ लागला.