शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिहं चंदेल यांच्या निवेदनाची शासनाने घेतली होती दखल
कुरखेडा (Police Bharti) : गडचिरोली जिल्हा हा आदिवासी बहुल असल्यामुळे जिल्ह्यात (Police Bharti) पोलीस भरतीमध्ये आदिवासी मुलांना प्राधान्य दिले जाते. बाकीच्या प्रवर्गाना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण दिले जाते. या वेळेस काढलेल्या पोलिस भरती जाहिरातिमध्ये EWS व OPEN मधील विद्यार्थ्यांना कुठलेही आरक्षण दिले नव्हते, कोरची, कुरखेडा, व जिल्ह्यातील शेकडो तरुणानी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिहं चंदेल यांची भेट घेऊन सदर झालेला अन्याय लक्षात आणून दिला.
निवड झाल्याने पेढे वाटून आनंद व्यक्त केला
शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्र सिहं चंदेल यांनी वेळ न घालविता शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्र सिंह चंदेल, महिला जिल्हा सांघटीका छाया ताई कुंभारे, जोसना राजूरकर आणि शेकडो पोलिस भरती साठी तय्यारी केलेल्या बेरोजगार युवकांनी गडचिरोली येथे जाऊन जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन निवेदन दिले होते व मागणी केली होती EWS व OPEN मधील मुलांना या (Police Bharti) पोलीस भरतीमध्ये संधी द्यावी.
शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिहं चंदेल यांच्या निवेदनाची शासनाने दखल घेऊन नवीन शुद्धीपत्रक जाहिरात काढली त्यात EWS व OPEN च्या विद्यार्थ्यांना स्थान मिळाले आणि काही उमेदवार पोलीस भरतीत निवड ही झाले आहे. हे गडचिरोली जिल्ह्यातील EWS व OPEN च्या विद्यार्थ्यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिहं चंदेल व पदाधिकारी यांचे आभार मानले आणि आज निवड झालेल्या उमेदवारांनी निवड झाल्या बद्दल घरी येऊन भेट घेऊन पेढा ही भरवला (Police Bharti) निवड झाल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर खूप आनंद होते शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्र सिंह चंदेल यांनी भावी यशस्वी साठी शुभेच्छा दिल्या