नवी दिल्ली/मुंबई (Ex-IAS Trainee Puja Khedkar) : माजी IAS Trainee पूजा खेडकर यांना सर्वोच्च न्यायालयाकडून (Supreme Court) मोठा दिलासा मिळाला आहे. आज न्यायालयाने खेडकर (Puja Khedkar) यांच्या अटकेला 14 फेब्रुवारीपर्यंत स्थगिती दिली आहे. खेडकर यांच्या अटकपूर्व जामिनाच्या याचिकेवर न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्ना आणि न्यायमूर्ती सतीशचंद्र शर्मा यांच्या खंडपीठाने दिल्ली सरकार आणि केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) यांना नोटीस बजावली.
Supreme Court orders no coercive action against former Indian Administrative Service (IAS) trainee officer Puja Khedkar.
Supreme Court issues notice to the Delhi government on the plea of Kedkar challenging the Delhi High Court order rejecting her anticipatory bail plea.…
— ANI (@ANI) January 15, 2025
माजी प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्यावर नागरी सेवा परीक्षेत ओबीसी (OBC) आणि अपंगत्व कोट्याअंतर्गत आरक्षणाचे फायदे फसवणूक करून घेतल्याचा आरोप आहे. पूजा खेडकर (Puja Khedkar) यांच्या वतीने बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील सिद्धार्थ लुथरा म्हणाले की, उच्च न्यायालयाच्या (Supreme Court) आदेशात तिच्याविरुद्ध गंभीर निष्कर्ष आहेत. जर प्रकरण खटल्यासाठी गेले तर (Supreme Court) उच्च न्यायालयाच्या आदेशात नमूद केलेल्या निष्कर्षांमुळे शिक्षा होण्याची चांगली शक्यता आहे.
केंद्राने त्यांच्या वर्तनाची आणि निवड प्रक्रियेची चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती देखील स्थापन केली आहे. तथापि, माजी प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्याने त्याच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.