शेतकरी व प्रहार सेवकांच्या वतीने जंगी सत्कार
मानोरा (Bachu Kadu) : तालुक्यातून शेंदुरजना आढाव येथील कर्जमुक्ती सभेला दि. ३० ऑगस्ट रोजी जात असताना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शेतकरी व प्रहार सेवकांनी शेतकरी नेते, माजी मंत्री बच्चू कडू यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.
शनिवारी शेंदूरजना आढाव येथे शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा व इतर मागण्या संदर्भात प्रहारच्या वतीने सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या सभेसाठी मानोरा बच्चू कडूंचा ताफा दाखल होताच शेतकरी प्रहार सेवकांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शेतकरी बाळू इंगोले, प्रकाश राठोड, महेश राठोड, निखिल वानखडे, विजय चव्हाण व प्रहार सेवकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
कर्जमाफी यासह यावर्षी हुमणी अळी सततचा व ढगफुटी पावसाने शेतकऱ्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. सरकार पंचनामे करण्याचे आदेश देत नाही. कर्जमाफी देत नाही, त्यामुळे शेतकऱ्यावर कर्जबाजारी होवून आत्महत्या करण्याची पाळी आलेली आहे. असा टाहो शेतकऱ्यांनी बच्चू कडू समोर शेतकऱ्यांनी फोडला.




