पुसद (Pusad):- माजी मंत्री तथा लोकनेते (People’s leader ) मनोहर नाईक व त्यांच्या पत्नी माजी नगराध्यक्ष सौ अनिता नाईक व आमदार इंद्रनील नाईक यांच्या अर्धांगिनी मोहिनी नाईक विधान परिषद (Legislative Council) आमदार ऍड निलय नाईक यांनी सपत्नीत यवतमाळ वाशिम लोकसभा (Yavatmal Washim Lok Sabha) मतदारसंघाकरिता दि.२६ एप्रिल रोजी पार पडत असलेल्या निवडणुकीच्या मतदानामध्ये मतदान करून लोकशाहीच्या निवडणूक रुपी मतदान उत्सवात सहभाग घेतला.
वयाच्या ८३ व्या वर्षी माजी मंत्री मनोहर नाईक हे व्हीलचेअरवर बसून मतदान केंद्रावर कुटुंबासह पोहोचले व मतदान केले. पुसद विधानसभा (Legislative Assembly) मतदारसंघांमध्ये मोठ्या उत्साहात दुपारी एक वाजेपर्यंत मतदान सुरू होते. तर उन्हाचा पारा वाढल्यामुळे दुपारी मतदान केंद्रावरील गर्दी थोडी ओसरली आहे. मतदान केंद्रावर मतदानाला प्रत्यक्ष सकाळी सात वाजता सुरुवात झाली असून सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. अकरा वाजेपर्यंत मतांची टक्केवारी पुसद विधानसभा मतदारसंघांमध्ये १८.६९ इतकी होती. विधानसभा मतदारसंघांमध्ये आतापर्यंत सर्वत्र शांततेत मतदान पार पडत आहे कुठेही अनुचित प्रकार घडल्याची माहिती अजून पर्यंत प्राप्त झालेली नाही.