पूर्णा (excessive heat) :अबकी बार तापमानाचा पारा ४० शी पार, तापमानही आता निवडणुकीच्या वातावरणा सारखे गरमागरम झाले असल्याचे अनुभवास मिळत आहे. सलग पाच दिवसांपासून पारा वाढतच चालला असून, रविवारी रोजी तर पूर्णा शहर व परिसरातील तापमान ४३ अंशावर तर किमान तापमान २७.०६ अंशापर्यंत नोंदवले गेले आहे. (Purna hospitals) शहरात तीव्रतेने उन्हाच्या झळा बसत आहे, रस्ते निर्मनुष्य झाल्याचे दिसत आहेत गर्मी,धग, उकाडा अतिशय त्रासदायक असल्याचे लोक सांगत आहे. सकाळपासूनच भीषण गर्मीमुळे लोकांचे हाल होत आहे.
सुर्य आग ओकतोय
दरम्यान, (excessive heat) उन्हातील कष्टाची कामे टाळून खबरदारी घेण्याच्या सूचना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरण आणि (Health Department) आरोग्य विभागाच्यावतीने देण्यात आला आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी लोक विविध उपाय करीत आहे. परंतू बाहेरगावी गेल्यानंतर त्यांची मोठी दमछाक होतांना दिसत आहे. सकाळी ११ वाजेपासून ते दुपारी ४ वाजेपर्यंत सर्वत्र रस्त्यांवर शुकशुकाट, वाहनांची तुरळक गर्दी असाच अनुभव येत आहे.
उष्णतेच्या लाटेमुळे पूर्णेकर हैराण
शासकीय कार्यालये, न्यायालयीन कामकाजाच्या वेळा तर सकाळी ११ वाजेपासूनच असतात. त्यामुळे काहींनी (excessive heat) उन्हात बाहेर पडल्याशिवाय गत्यंतर नाही. आज रविवारी (दि.५) पूर्णा शहरात कमाल तापमान ४३अंश तर किमान तापमान २७.०६ अंशापर्यंत नोंदवले गेले आहे. उष्णतेची लाट आणखी काही दिवस राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. १ मे पासून तापमान चाळीशीवरच आहे. १ मे रोजी कमाल तापमान ४१.१ (किमान २६.०), २ मे रोजी कमाल ४१.१ (किमान २६.४), ३ मे रोजी ४१.३ (किमान २६.२), ४ मे रोजी ४१.३ (किमान २५.००) तर ५मे रोजी ४३.० (किमान २७.६) अशी नोंद झाली आहे.
सर्व पीएचसीमध्ये नियंत्रण कक्ष स्थापन
वाढत्या उन्हामुळे आजारी पडलेल्या रूग्णांवर तातडीने उपचार व्हावेत. म्हणून येथिल (Purna hospitals) ग्रामीण रुग्णालयासह जिल्हा परिषदेच्या (Health Department) आरोग्य विभागाने जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये नियंत्रण कक्ष स्थापन केले असून पुरेशा औषधीसाठा आणि रूग्णाच्या खोलीत हवा खेळती रहावी म्हणून पुरेशा व्यवस्था करण्यात आल्याची माहिती आहे.