मैदानी खेळांमुळेच मुलांचा शारीरिक, मानसिक विकास
नागपूर (Mobile phones dangerous) : मैदानी खेळ मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वात महत्त्वाचा घटकआहे. (Mobile phones) मोबाईलमुळे मुले खेळापासून परावृत्ता होत आहेत. त्यामुळे त्यांचा मानसिक आणि शारीरिक विकास जलद गतीने होत नाही. पालकांनी मुलांना मोबाईलपासून दूर ठेवून मानसिक व शारीरिक विकासासाठी योग्यवेळी त्यांना मैदानी खेळात सहभागी करून घेतले पाहिजे. तरच मुलाचा शारीरिक व मानसिक विकास चांगला होऊ शकेल.
खेळांमुळे मुलांचा शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि भावनिक विकास होतो. जीवनातील चढ-उतारांना कसे सामोरे जायचे हे शिकण्यास मदत करते. नियमांचे पालन करण्यास, शिकण्यास मदत करते. परस्पर संवाद, समन्वय, संयम शिकण्यास मदत करते. (Mobile phones) स्नायूंची ताकद आणि लवचिकता वाढते आणि वेदना कमी होतात. आत्मसन्मान व एकाग्रता वाढते आणि आशावाद वाढतो. मुलांच्या संवेदना उत्तेजित होतात, ज्यामुळे शिक्षण आणि विकासाला चालना मिळते. सर्जनशीलताही वाढते. भाषा विकासाला चालना मिळते. विविध खेळांमुळे तणावही कमी होतो. विविध आकार समजण्यास मदत करते. आधी आणि नंतर, डावीकडे आणि उजवीकडे, वर आणि खाली अशा संकल्पनांचा अर्थ शिकण्यास मदत होते.
मुलांना मोबाईलपासून (Mobile phones) परावृत्त करण्यासाठी त्यांच्यासोबत वेळ घालविण्याची गरज आहे. पालकांनी त्यांच्याशी खेळले पाहिजे. मुलांच्या आवडीची विशेष काळजी घेतली पाहिजे. मोबाईलपेक्षा पुस्तकांचे वाचन करण्याची मुलांना सवय लावली पाहिजे. त्यांना सवय लावण्यासाठी पालकांनी स्वत: पुस्तके वाचले पाहिजे. मुलांना चित्रकला, खेळणे यासारख्या मनोरंजक उपक्रमात व्यस्त ठेवले पाहिजे. वाचन, खेळ आणि इतर छंद जोपासल्याने मुलांचा स्क्रीन टाईम कमी होण्यास निश्चितच मदत होऊ शकते.