हिंगोली (Excise Department Raids) : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने नाताळ व नवीन वर्षानिमित्त अवैध दारूवर कारवाई केली ज्यामध्ये 14 जणांवर गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून 99 हजार रुपयाचा मुद्देमाल व दारू साठा जप्त करण्यात आला.
नाताळ व नवीन वर्ष उत्सवाच्या पार्श्वभुमीवर राज्य उत्पादन शुल्क हिंगोली विभागाने दिनांक २३ ते २६ डिसेंबर दरम्यान सामुहीक मोहीम राबवुन निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, हिंगोली, निरीक्षक, भरारी पथक, हिंगोली, दुय्यम निरीक्षक हिंगोली यांचे (Excise Department Raids) तिनही पथकाने कळमनुरी, हिंगोली वसमत परिसरात अवैध मद्य विक्री तसेच वाहतुकीवर छापा टाकून १४ आरोपी विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलमांतर्गत गुन्हा नोंद केला. सदर कारवाईत देशी मद्याच्या १८० मिलीच्या ४५६ बाटल्या, विदेशी मद्याच्या १८० मिलीच्या ३० बाटल्या, हातभट्टी १४.३२ लिटर, रसायन ४३० लिटर व एक दुचाकी वाहन असा एकुण रु. ९९,०५०/- किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करुन १४ आरोपी विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला.
ही कारवाई अधीक्षक आदित्य पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक मोहन मातकर, प्र. निरीक्षक भरारी पथक, हिंगोली टी.बी. शेख, कृष्णकांत पुरी, प्रदिप गोणारकर , श्रीमती ज्योती गुट्टे, जयवंत जाधव तसेच स.दु.नि. श्री कांबळे जवान आडे, राठोड, व ईतर कर्मचाऱ्यांनी यशस्वीरित्या पार पाडली.