पांढरकवडा (Yawatmal) :- तालुक्यात सर्रास देशी व गावठी दारुची तस्करी सुरु आहे. देशी, विदेशी दारुची (foreign liquor) वाहतुक करणार्या व गावठी दारुचे गाळप करणार्या विरुध्द अबकारी खात्याच्या वतीने कार्यवाहीचा बडगा उगारण्यात येत नसल्याने दारु तस्करांचे चांगलेच फावत आहे. केळापुर तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैद्य देशी, विदेशी दारुची तस्करी सुरु आहे.
केळापुर तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैद्य देशी, विदेशी दारुची तस्करी सुरु
गावागावात गावठी दारुचे गाळप सुरु आहे. गावठी दारुमुळे अनेक गावात वाद व तंटे निर्माण होत आहे. लोकसभा (Lok Sabha), विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections) काळातही देशी,विदेशी व गावठी दारुंचा महापुर आला होता. त्याही वेळेस अबकारीच्या अधिकार्यांनी अवैद्य दारु विक्रेत्यावर पाहिजे त्या प्रमाणात कार्यवाह्या केल्या नव्हत्या. पांढरकवडा शहरातुन तथा ईतर गावातील परवाना धारक देशी,विदेशींच्या दुकानातुन तालुक्यातील गावागावात खुलेआम पध्दतीने दुचाकी तथा चारचाकी वाहनाने दारु पोहचविण्यात येत आहे. खर तर अवैद्य दारु विक्री व तस्करीबाबत अबकारी विभागाने कठोर पाउले उचलण्याची आवशक्ता आहे. परंतु अबकारीचे अधिकारी दारु विक्रीत वाढ होण्याचेच प्रयत्न करतांना दिसुन येत आहे. देशी व विदेशी दारुच्या तस्करीबाबत माहिती देण्यात आली असतांना सुध्दा अबकारीचे अधिकारी कार्यवाहीसाठी पुढाकार घेत नसल्याचा अनेकांना याआधीचा अनुभव आहे. गावठी दारु बाबत सुध्दा ते कठोर भुमिका घेत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
तालुक्यातील काही देशी दारुच्या दुकानातुन तर तेलंगाणातील अदिलाबाद जिल्ह्यातील गावागावात देशी दारुची तस्करी करण्यात येत असल्याचे बोलल्या जात आहे. पण त्यांच्यावर सुध्दा अबकारीच्या अधिकार्यांनी अद्यापही कार्यवाहीचा फास आवळलेला नाही हे विशेष.




