माहूर (Nanded):- राष्ट्रीय महामार्गात लगत असलेल्या शेतात अज्ञात महिलेचे अर्धवट अवस्थेत जळालेले प्रेत दि.५ जुन च्या रात्री अंदाजे साडे नऊ वाजताच्या सुमारास दिसून आले. या घटनेने माहुर तालुक्यात खळबळ उडाली असुन नेमके या जळीत कांड घडविण्याचे मागचे रहस्य काय ? सदरील महीला कोण ? यांचा छडा लावण्याचे माहुर पोलिसांन पुढे आवाहन उभे आहे.
माहूर किनवट या राष्ट्रीय महामार्गा वरील मौजे नखेगाव आष्टा फाटा दरम्यान असलेल्या राठोड यांच्या शेतातील विहीरीत जवळ जळतंन जमा करून ठेवले होते. त्या जळणात दि ५ जुन च्या रात्री अंदाजे साडे नऊ वाजताच्या सुमारास अर्धवट जळालेल्या अवस्थेत एका अज्ञात महिलेचे प्रेत (corpse) पडुन असल्याची घटना उघडकीस आल्याने अप्पर पोलीस अधीक्षक खंडेराय धरणे उपविभागीय पोलिस अधिकारी रामकृष्ण मळघने माहुर पोलिस स्टेशन(Police Station) चे ठाणेदार शिवप्रकाश मुळे सिंदखेड पोलिस स्टेशन चे ठाणेदार सुशांत किंनगे व पोलिस कर्मचारी यांनी तातडीने घटनेचे गांभीर्य लक्षात घेता घटनास्थळी रवाना होत तपासणी केली असुन सदर घटनेची नोंद पोलिस स्टेशन माहुर येथे घेण्यात आली आहे.