परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील इसाद केंद्रावरील प्रकार, गुन्हा दाखल
परभणी (Exam Center) : बारावी परीक्षा केंद्र परिसरात विनाकारण फिरत असलेल्या एकाला हटकल्यावर संबंधीताने होमगार्डला तुला पाहुन घेतो असे म्हणत धमकी दिली. ही घटना गंगाखेड तालुक्यातील इसाद येथील (Exam Center) श्री बालाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय परिसरात १७ फेब्रुवारी रोजी दुपारी १.३० च्या सुमारास घडली. या प्रकरणी गंगाखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गृहरक्षक दलाचे जवान सिध्देश्वर पाळवदे यांनी तक्रार दिली आहे. फिर्यादी हे इसाद येथील परीक्षा केंद्रावर बंदोबस्तात होते. यावेळी प्रदिप भगवानराव भोसले याने महाविद्यालयाच्या (Exam Center) परीक्षा हॉलमध्ये प्रवेश केला. तो परत आल्यानंतर फिर्यादीने त्यांना तुम्ही कोणतेही पदाधिकारी नसताना महाविद्यालयाच्या आवारात, इमारत परिसरात वावरत आहेत असे म्हणताच आरोपीने फिर्यादीला अश्लिल शिवीगाळ केली.
तुझ्या सारखे होमगार्ड खुप पाहिलेत असे म्हणत दगड मारला. फिर्यादीने तो दगड चुकविला. आरोपीने होमगार्डला परीक्षा संपल्यावर तुझी बगतो असे म्हणत धमकी दिली. घडला प्रकार (Exam Center) होमगार्डने वरिष्ठांना सांगितला. त्यानंतर गंगाखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोउपनि. गंगलवाड करत आहेत.