परिवर्तन शेतकरी संघटनेचा इशारा
मानोरा (Soybeans Price) : सध्या सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. नाफेड सरकारी सोयाबीन खरेदीची मुदत संपल्याने हजारो शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी होणे बाकी आहे. मात्र मुदत संपल्याने राहिलेल्या सोयाबीनचे करायचे काय? या विवंचनेत शेतकरी असताना राज्याचे पणन खाते सांभाळणाऱ्या मंत्री जयकुमार रावल यांनी शेतकऱ्यांना दिलासा द्यायचे सोडून आतापर्यंत झालेल्या (Soybeans Price) सोयाबीन खरेदीला तीन वेळा मुदतवाढ दिल्याचे सांगत हात झटकण्याचा प्रकार करीत आहे . त्यामुळे आता शेतकऱ्यांनी न्याय मागावे तर कोणाकडे असा सवाल शेतकरी करीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना घामाच्या धान्याला खरेदी किंमत देऊन न्याय द्यावा अथवा सोयाबीन खरेदीला मुदतवाढ द्यावी, अन्यथा शेतकऱ्याचा सोयाबीन मंत्रालयात फेकणार असल्याचा इशारा परिवर्तन शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मनोहर राठोड यांनी शासनाला दिला आहे.
राज्यामध्ये नाफेड अंतर्गत सोयाबीन खरेदी मोठ्या प्रमाणात होत असताना गुरुवारी दि.६ फेब्रुवारी (Soybeans Price) सोयाबीन खरेदीची मुदत संपल्याने सोयाबीन खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी केलेल्या ४५% शेतकऱ्यांच्या घरात सोयाबीन पडून आहे. सोयाबीन खरेदीसाठी किमान एक महिन्याची मुदतवाढ मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांतून करण्यात येत असताना पणन मंत्री जयकुमार रावल इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात ७ लाख ६४ हजार ७३१ शेतकऱ्यांपैकी ३ लाख ६९ हजार ११४ शेतकऱ्याकडून ७ लाख ८१ हजार ४४७ मॅट्रिक टन (Soybeans Price) सोयाबीन खरेदी झाल्याचे आकडेमोड करण्यात वेळ दळवीत आहे . ही योजना शेतकऱ्यांसाठी की व्यापारासाठी असा सवालही उपस्थित होत आहे. राज्यातील लाखो शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी होणे बाकी आहे.
राज्यांचे सोयाबीन उत्पादन हे ६० ते ६५ लाख मेट्रिक टन आहे. सरकार १३ लाख मॅट्रिक्ट टन सोयाबीन खरेदी करणार आहे. त्यातील सरकारने फक्त ७ ते ८ लाख मेट्रिक टन सोयाबीन खरेदी केले आहे. राहिलेले सोयाबीन शेतकऱ्यांनी कुठे फेकायचे असा सवाल राठोड यांनी करत ही योजना शेतकऱ्यांसाठी आहे की व्यापारासाठी आहे ? ज्या संस्थांची कुवत सोयाबीन खरेदीची नव्हते, त्या संस्थाना (Soybeans Price) सोयाबीन खरेदी करण्याचा अधिकार दिला त्यात संस्थांकडे ८ – ८ दिवस बारदाना नसल्याकारणाने सोयाबीन खरेदी ठप्प ठेवली होती. त्यामुळे या काळात अनेक शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी झाली असती परंतु बारदानाच्या नावाने व्यापाऱ्याची सोयाबीन खरेदी केल्या गेल्या आहेत. तेव्हा सोयाबीन खरेदीला मुदतवाढ न दिल्यास परिवर्तन शेतकरी संघटनेच्या वतीने मंत्रालयासमोर (Soybeans Price) सोयाबीन फेकणार असल्याचा इशारा सरकारला दिला आहे.