नांदेड(Nanded) :- अवैध सावकारी वसूली (Recovery) किंवा इतर वसूलीसाठी कोणी मानसिक त्रास (mental distress)देण्याचा प्रयत्न करीत असेल तर तो बेकायदेशिर किंवा कायदेशिर वसूलीसुध्दा कोण्या व्यक्तीकडून धमकी(threat) देण्यात येत असेल किंवा अव्वाच्या सव्वा व्याजाची वसूली करण्यात येत असेल तर संबंधितांनी पोलिसांशी संपर्क साधावा. त्या बाबत खंडणीसारखा कायदेशिर गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती नांदेडचे जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिली आहे. अंबिकानगरातील एका उद्योजकांने खासगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली.याबाबत भाग्यनगर पोलिसांनी सावकारी अधिनियम व आत्महत्येस (suicide) प्रवृत्त केल्या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या संदर्भात पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या कडून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला यावेळी ते प्रसार माध्यमाशी बोलत होते.
Nanded extortion: तक्रार करा खंडणीचा गुन्हा दाखल करु..
