परभणी (Parbhani):- कर्ज कसे फेडावे या विवंचनेत नैराश्यात गेलेल्या एका शेतकर्यांने रेल्वेखाली (Railway)उडी मारुन आत्महत्या(Suicide) केली. ही घटना शुक्रवार २८ जून रोजी दुपारी दिड वाजेच्या सुमारास परभणी तालुक्यातील पारवा शिवारात घडली. या प्रकरणी परभणी ग्रामीण पोलिसात अकस्मात मृत्युची(sudden death) नोंद करण्यात आली आहे.
परभणी तालुक्यातील पारवा शिवारातील घटना
बाबुराव आश्रोबा मुटकुळे वय ५५ वर्ष, असे आत्महत्या केलेल्या शेतकर्याचे नाव आहे. या बाबत रामेश्वर मुटकुळे यांनी खबर दिली आहे. बाबुराव मुटकुळे यांची पारवा शिवारात गट नंबर २७६ मध्ये दोन एकर शेती आहे. शेतीवर घेतलेले कर्ज फिटत नसल्याने हे कर्ज (Loan)कसे फेडावे या नैराश्यात त्यांनी नांदेड ते छत्रपती संभाजी नगर या रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेत रुग्णालयात(hospital) पाठविला. प्रकरणाचा तपास पोउपनि. बी.जी. चव्हाण करत आहेत.