हिंगोली (Facebook Fake post) : फेसबुक सोशल मिडीयावर (Facebook Fake post) संतोष बांगर यांच्या घरासमोर आधी शिवीगाळ व नंतर फायरींग झाली होती. अशा संदर्भात खोटी बातमी व्हायरल करून नागरिकांच्या मनात भिती पसरविण्याचे काम केल्याने (Ayodhya Paul) अयोध्या पौळ यांच्यावर हिंगोली शहर पोलिसात (Hingoli Police) अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सुत्राने दिलेली माहिती अशी की, (Ayodhya Paul) अयोध्या पौळ यांनी २९ मे रोजी रात्री ७ च्या सुमारास फेसबुक या (Social media) सोशल मिडीयाच्या पेजवर ‘विश्वसनीय सुत्राच्या माहितीनुसार परवा संतोष बांगर यांच्या घरासमोर आधी शिवीगाळ अन् नंतर फायरींग झाली होती म्हणे? सत्ताधारी आमदार महाराष्ट्राच्या जनतेला काय खर काय खोटं सांगतील का’ अशा प्रकारची पोस्ट खात्री न करता खोटी बातमी व्हायरल करून (Hingoli Police) हिंगोली शहरातील नागरिकांच्या मनात भिती पसरविण्याचे काम केल्याने (Hingoli Police) हिंगोली शहर पोलिसात सायबर सेलच्या महिला पोलिस शिपाई प्रणिता गुलाबराव मोरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून (Ayodhya Paul) अयोध्या पौळ यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोटे हे करीत आहेत.