नवी दिल्ली (Fake trading apps) : डिजिटल जग बनावट ॲप्सने भरलेले आहे. या ॲप्सच्या मदतीने दररोज लोकांची फसवणूक केली जाते. कोणाचीही फसवणूक होईल, अशा पद्धतीने हे ॲप्स तयार करण्यात आले आहेत. आजकाल सर्वांनाच ट्रेडिंगचे वेड लागले असून त्याचा फायदा सायबर घोटाळेबाज घेत आहेत. आता असेच (Fake trading apps) एक ट्रेडिंग ॲप ओळखले गेले आहे जे बनावट आहे.
ॲप एएमबीएल प्रो नावाने ॲप स्टोअरवर सूचीबद्ध
एएमबीएल प्रो ॲपलच्या ॲप स्टोअरवर सूचीबद्ध केले गेले आहे. (Fake trading apps) ॲपच्या वर्णनासोबत असा दावा करण्यात आला आहे की, हे आदित्य बिर्ला ग्रुपचे ॲप आहे. ज्याद्वारे तुम्ही ट्रेडिंग करू शकता. या ॲपच्या स्क्रीनशॉटमध्ये सेन्सेक्स आणि निफ्टी पाहता येणार आहे.
सायबरने दिला इशारा
सरकारी सायबर एजन्सी सायबर दोस्तने AMBL Pro बाबत इशारा दिला आहे. सायबर दोस्तने X वरील त्यांच्या एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, AMBL Pro हे बनावट ॲप आहे, जे ॲपलच्या ॲप स्टोअरवर उपलब्ध आहे. हे (Fake trading apps) ॲप डाउनलोड करू नका किंवा कोणत्याही प्रकारचे व्यवहार करू नका. या ॲपमुळे तुमचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.
Fraud Stock Trading App Alert ‼️
Cybercriminals have uploaded multiple fake stock trading apps on @Apple Store. Installing these app may result in financial loss.@FinMinIndia @HMOIndia @AdityaBirlaGrp#Nifty #Sensex #FactCheck pic.twitter.com/yPFGfbKY8u
— Cyber Dost (@Cyberdost) August 15, 2024