परभणी(Parbhani):- घराच्या दुसर्या मजल्यावरील छतावर फोनवर बोलत असलेल्या एका २१ वर्षीय तरुणीचा छतावरून खाली पडल्याने मृत्यू झाला.
फोनवर हेडफोन लावून बोलत असताना दुसर्या मजल्यावरील छतावरून खाली पडून मृत्यू
ही घटना शुक्रवार १२ जुलै रोजी रात्री ११.१५ च्या सुमारास परभणी शहरातील यशवंत नगर भागात घडली. या प्रकरणी नवा मोंढा पोलीसात आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. बाबासाहेब लोखंडे यांनी खबर दिली आहे. शृती लोखंडे वय २१ वर्ष असे मृत तरुणीचे नाव आहे. शुक्रवारी रात्री खबर देणार यांच्या नावाने शृती छतावरून(roof) पडली असल्याचे सांगितले. फोनवर हेडफोन(headphones) लावून बोलत असताना शृती दुसर्या मजल्यावरील छतावरून रोडवर खाली पडली. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने नाक, कानातून रक्त निघत होते. शृतीला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला तपासून मृत(Dead) घोषित केले. शृतीचे वडील हे पोलीस दलात कार्यरत आहेत. तर शृती हे देखील पशु वैद्यकीय महाविद्यालय(College of Veterinary Medicine) परभणी येथे तृतीय वर्षात शिक्षणाला होती. नवा मोंढा पोलीसात आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून तपास पोउपनि. सुलोचना गाडेकर करत आहेत.