मानोरा (Washim):- तालुक्यातील कारपा या गावाचे निवासी पोलीस शिपाई अनिल नामदेव राठोड (वय ३७) यांचे दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दुर्दैवी निधन (passed away) झाले आहे.
कारपा येथील पोलीस अनिल राठोड यांच्या कुटुंबावर शोककळा
लाखांदूर जिल्हा भंडारा या पोलीस स्टेशनला मृतक अनिल राठोड हे मागील तीन वर्षांपासून कार्यरत होते. लाखांदूर राष्ट्रीय महामार्गावरून(National Highway) काल रात्री सव्वा अकराच्या दरम्यान कर्तव्य संपवून राहत असलेल्या ठिकाणी दुचाकीने जात असताना चिखलाचा अंदाज न आल्याने दुचाकी चिखलावरून घसरल्याने पोलीस कर्मचारी अनिल राठोड हे रस्त्यावर पडून गंभीर दुखापतग्रस्त झाले होते. पोलीस कर्मचाऱ्याचा अपघात (Accident)झाल्याची माहिती मिळताच संबंधित पोलीस स्टेशन मधील कर्मचाऱ्यांनी आपल्या वाहनाने लाखांदूर ग्रामीण रुग्णालयाला प्रथम उपचारासाठी दाखल केले मात्र अनिल राठोड हे दगावल्याची माहिती स्थानिक रुग्णालय प्रशासनाने पोलीस विभागाला दिल्याची माहिती समोर येत आहे.
अंतिम संस्कार समयी शेवटची सलामी देण्यासाठी वाशिमचे पोलीस पथकाना पाचारण करण्यात आले
कारपा येथील मृत पोलीस कर्मचारी अनिल राठोड यांच्या मागे पत्नी व मुलगा आहे. मृतक अनिल राठोड यांच्या अकाली निधनाने कारपा आणि पंचक्रोशी मध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस प्रशासनाच्या वतीने सेवेत कार्यरत असलेल्या मृत कर्मचाऱ्याला अंतिम संस्कार (last rites) समयी शेवटची सलामी देण्यासाठी वाशिमचे पोलीस पथकाना पाचारण करण्यात आले होते. यावेळी मानोरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रवीण शिंदे आणि इतर कर्मचारी हजर होते.