वसमत(Hingoli):- वसमत येथील अभियंता योगेश पांचाळ हा गेल्या 27 दिवसापासून बेपत्ता आहे तो इराण येथे नोकरीसाठी गेला होता तिथून बेपत्ता झाला वसमत येथे रविवारी वसुमती मॅरेथॉन स्पर्धेच्या उद्घाटनासाठी मंत्री इंद्रनील नाईक हे वसमत येथे आले होते त्यांनी योगेश पांचाळ यांच्या कुटुंबाची भेट घेऊन कुटुंबीयांना दिलासा दिला आणि योगेशला शोधून आणणार असल्याचे आश्वासन दिले.
मुलाला लवकर शोधून आणण्याचे दिले आश्वासन
वसमत येथे वसुमती मॅरेथॉन (Marathon) स्पर्धेच्या उद्घाटनासाठी मंत्री इंद्रनील नाईक हे वसमत येथे आले होते. वसमत येथील तरुण अभियंता इराण मध्ये बेपत्ता झाला आहे. शोध लागत नाही हे समजल्याने इंद्रनील नाईक व आमदार राजू पाटील नवघरे यांनी योगेश पांचाळ यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. इराणमध्ये बेपत्ता झालेल्या वसमतच्या योगेश पांचाळची आई व भाऊ मंगेश पांचाळ यांनी इंद्रनील नाईक व आमदार राजू पाटील नवघरे यांच्या समोर व्यथा मांडल्या गेल्या 27 दिवसापासून त्यांचा मुलगा बेपत्ता आहे. मुलाचा शोध घेण्यासाठी अनेक प्रयत्न केले पण यश येत नाही तुम्ही यासाठी मदत करा असे म्हणत त मुलगा शोधून आणावा अशी मागणी करत योगेश च्या आईने टाहो फोडला.
यावेळी इंद्रनील नाईक यांनी यासंदर्भात गृहमंत्री अमित शहा यांच्याशी संपर्क साधून योगेशला परत आणू असे आश्वासन कुटुंबियांना दिले. मंत्री इंद्रनील नाईक यांनी योगेश पांचाळ यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करून त्यांना धीर दिला.