वाकद शिवारातील घटना!
रिसोड (Farm Fire) : शेतातील गोठ्याला (Gotha) आग लागून शेती उपयोगीसाहित्य जळून खाक (Burn Up) होऊन, यामध्ये एक लाख रुपयाचे नुकसान झाल्याची घटना दिनांक 10 मे रोजी संध्याकाळी सहा वाजता रिसोड तालुक्यातील वाकद शेत शिवारात (Farms) घडली. आग लागल्याची माहिती मिळताच, शेतकरी व आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र आगीन एवढे उग्ररूप धारण केले होते की, शेतकऱ्यांना (Farmers) सदर कोठा वाचण्यात अपयश आले. याबाबत माहिती अशी की, रिसोड तालुक्यातील वाकद शेत शिवारामध्ये गजानन पैठणकर या शेतकऱ्याची शेती असून, यामध्ये टिन पत्राच्या बांधलेल्या या कोठ्यामध्ये पैठणकर यांनी शेती उपयोगी ठेवलेले. साहित्य ज्यामध्ये स्प्रिंकलर पाइप, तोट्या, ताटपत्री पाण्याची टाकी अन्य साहित्य व कोट्याचे टिन पत्रे जळून यामध्ये एक लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. आग कशी लागली याबाबत मात्र कळू शकले नाही. सदर आगीमध्ये झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून योग्य तो मोबदला (Compensation) मिळून देण्यात यावा अशी मागणी गजानन पैठणकर यांनी केली आहे.