Maregaon news :- फिस्की जंगलालगत ठेक्याने केलेल्या शेतात वन्यप्राण्याचा उपद्रवापासून पिकाचे रक्षण करण्याकरिता लावलेल्या विजेच्या ताराला स्पर्श झाल्याने शेतमजुराचा दुर्देवी मृत्यू(Death) झाल्याची घटना तालुक्यातील मार्डी येथे १९ ऑक्टोबरला सकाळी उघडकीस आल्याने हळहळ व्यक्त होत आहे. मृतकाचे नाव शामसुंदर उद्धव कुमरे वय ३३ असे आहे.
विजेच्या ताराला स्पर्श झाल्याने शेतमजुराचा दुर्देवी मृत्यू
शामा उर्फ शामसुंदर हा मार्डी शिवारात असलेली शेती भाड्याने करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. भाड्याने केलेली शेती फिसकी जंगलाला लागून असल्याने वन्यप्राण्याचा उपद्रव मोठ्या प्रमाणात असल्याने शेतमालाचे रक्षण करण्याकरिता १८ ऑक्टोबरला सकाळी शेतात गेला परंतु तो रात्रीही परत न आल्याने दुसर्या दिवशी १९ ऑक्टोबरला शोधशोध केली असता सकाळच्या सुमारास शामा मृतावस्थेत दिसून आला. मृतकाच्या पश्चात आई, पत्नी व दोन मुली आहे. याबाबत मारेगाव पोलीस स्टेशन (Police station) अंतर्गत पोलीस निरीक्षक शाम वानखडे यांचे मार्गदर्शनाखाली जमादार दिगांबर किनाके अधिक तपास करीत आहे