शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे!
छत्रपती संभाजीनगर (Farm Loan Waiver) : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत अत्यंत मर्यादित साधनांमध्येही उद्धवसेनेने चांगले यश मिळवले. जिल्हा परिषदेत ९ आणि पंचायत समितीत ११ सदस्य निवडून आले. या निवडणुकीत शिवसेनेची भूमिका निर्णायक ठरणार आहे. मात्र, भाजप आणि शिंदे सेनेला पाठिंबा दिला जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेत मांडली.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बाबत विचारले असता दानवे म्हणाले की, कर्जमाफी झालीच पाहिजे. राज्य सरकारकडे आर्थिक क्षमता आहे का, हा प्रश्न आहे. एवढा उशीर का लागतो, हेही विचारण्यासारखे आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालीच पाहिजे. अन व औषधी प्रशासनातील लाचखोरीवर दानवे यांनी टीका केली. मंत्रालयात लाच घेताना अधिकारी पकडले गेले. गावापासून मंत्रालयापर्यंत लाचखोरीची साखळी आहे. अधिकारी, कर्मचारी कुणालाही
जुमानत नाहीत. सर्व वरिष्ठांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अर्श मागणी त्यांनी केली.
मातृभूमी प्रतिष्ठानच्या संपर्क कार्यालयात विजयी सदस्यांच निवडीत बैठक झाली. त्याआधी पत्रकारांश संवाद साधताना दानवे म्हणाले की सिल्लोड वगळता सर्व तालुक्यांत उद्धवसेनेला प्रतिनिधीत्व मिळाले. पदाधिकाऱ्यांच्या शिवसेनेचा निर्णय महत्त्वाच ठरणार आहे. पक्षाच्य निर्णयाविरोधात कुणी वैयक्तिक पाठिंबा दिला, तर तो विचारात घेतला जाईल.




