पुसद (farm manure) : खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मान्सून पूर्व शेती मशागतीचे कामे तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात हातात वेगळी केली आहेत. तर शेतामध्ये शेणखत (farm manure) टाकल्या जात आहे. रासायनिक खताचा अतिवापर केल्यामुळे जमिनीची पोत कमी होते. शेणखताचा वापर केल्यामुळे जमिनीची पोत राखण्यास मदत मिळते. व हंगामातील शेती उत्पादन चांगले होते. (farm manure) शेणखत शेतामध्ये टाकण्याची रुटीन परंपरा असून गेल्या काळापासून समस्त शेतकरी बांधव शेणखताचा मोठ्या प्रमाणात वापर करीत आहेत.
प्रति ट्रॉली 3 ते 4 हजार रुपये दर
मात्र, अलीकडे जादा उत्पादन मिळविण्याच्या नादात (Chemical fertilizers) रासायनिक खतांचा औषधींचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागल्यामुळे दिवसेंदिवस शेतजमिनीची उत्पादनक्षमता कमी होत असल्यामुळे शेतकऱ्यांना याचा फटका पिकांच्या उत्पादनावर होताना दिसून पडला आहे. यामुळे शेतकरी पुन्हा सेंद्रिय शेतीसह (farm manure) शेणखताकडे वळले आहेत. ज्या शेतकरी बांधवांकडे मोठ्या प्रमाणात पशुधन आहे. त्यांना त्यांच्या शेतातच उपलब्ध होत आहे. तर ज्या शेतकरी बांधवांकडे पशुधन अपुरे आहे. ते विकत घेऊन एकरी दोन-तीन ट्रॉल्या शेणखत शेतामध्ये टाकत आहेत. शेणखताचा दरही वाढला आहे. यंदा शेणखताला सोन्याचे दिवस आले आहेत…! प्रतीक ट्रॉली तीन ते चार हजार रुपये (farm manure) शेणखताला द्यावे लागत आहे. हे विशेष.