मानोरा(Washim):- तालुक्यातील मौजे सोमनाथनगर येथे जैन प्रकोष्ठ अंतर्गत तालुका कृषि विभागाच्या (Department of Agriculture) अधिपत्याखाली १ लक्ष १० हजार ८८९ स्केअर फुट शेततळ कामाला ५ वर्षापूर्वी सुरूवात करण्यात आली होती. सदरील काम अर्धवट असुन त्वरित शेततळाच्या कामाला सुरुवात करण्यात यावी, अशी मागणी शेतकरी राधेश्याम राठोड यांच्यासह गावकरी मंडळीकडून होत आहे.
काम पूर्ण करण्याची शेतकरी व ग्रामस्थांची मागणी
सविस्तर असे की, सोमनाथनगर गाव शेजारी पाण्याची कृत्रिम टंचाई भासू नये, याकरीता जैन प्रकोष्ट अंतर्गत तालुका कृषि विभागाच्या अधिपत्याखाली सन २०१९ मध्ये बंधारा कामाला सुरुवात करण्यात आली होती. तेंव्हापासून सदर शेततळाचे काम अर्धवट करून बंद पाडण्यात आले आहे. शेततळाचे काम अर्धवट असल्याने परिसरातील शेतकरी व गावात पाणी टंचाई समस्या उदभवत आहे. सदरील कामाला संबंधितांनी तात्काळ सुरूवात करावी व शेतकरी, गावकरी मंडळींची समस्या सोडवावी, अशी मागणी शेतकरी श्याम राठोड यांच्यासह बर्फ राठोड, नारायण सुकलाल, पंडीत राठोड, तारासिंग चव्हाण, प्रकाश राठोड, दिलीप राठोड, रमेश राठोड, नामदेव राठोड आदींनी केली आहे.