मानोरा (Farmer Agricultural) : शेतकऱ्यांच्या शेतमालाला खर्चावर आधारित भाव द्यावा, या कित्येक वर्षांपासूनच्या मागणीला सरकारी स्तरावर दाद मिळत नाही. शेती तोट्यात जात असल्याने शेतकरी आत्महत्यासारखा मार्ग पत्करत आहे. महागाईमुळे (Farmer Agricultural) शेती व्यवसाय खर्चाला परवडत नाही. शेती जगण्यासाठी त्याच्या शेतमालाला खर्चावर आधारित भाव द्यावा, अशी मागणी शेतकरी वर्गामधून होत आहे.
पुर्वी शेतकऱ्यांची पोटापुरती शेती होती. तेंव्हा सर्वच काही स्वस्त व मुबलक होते. आता आधुनिक युगात सारेच काही महागले आहेत. निसर्ग सुद्धा कोपला आहे. खर्चाच्या दृष्टीने शेती परवडत नसल्याने अनेक (Farmer Agricultural) शेतकरी ठेक्याने शेती देतात. आता तर पन्नास, शंभर एकर शेती असलेला शेतकरीही महागाईने हवालदिल झाला आहे.
स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही सरकारच्या कचखाऊ धोरणामुळे शेतकऱ्यांचा बळी जात आहे. ही देशाची शोकांतिका म्हणावी लागेल. काळ बदलला मात्र शेतकऱ्यांची परीस्थिती बदलली नाही. या प्रश्नांची उत्तरे शोधण्याची नितांत गरज असुन दिवसेंदिवस शेतकरी कर्जबाजारी होत असल्याने आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलत आहे. मातीतून सोने पिकविणारा शेतकरी (Farmer Agricultural) गावात राहतो. परंतु त्या गावाची प्रगती अजुनही शून्यच आहे. यामुळे त्याच्या कष्टाला मूल्य नाही. एकवेळ मजूर मजुरीवर पोट भरून सुखी आहे. पण शेतकरी आत्महत्या करत आहेत.