जिल्हाभरातुन सावरगांव डुकरे कडे हजारो शेतक-यांचा ओढा
चिखली (Farmer Andolan) : शेतक-यांच्या रक्ताच्या झालेल्या अपमानाची सरकारने माफी मागावी यासाठी आदर्ष गाव सावरगांव डुकरे येथे शेतकरी बांधवासह दि. 23 सप्टेंबर पासुन अन्नत्याग आंदोलनाला माजी आमदार राहुलभाउ बोंद्रे व शेतक-यांनी सुरूवात केली आहे. मंगरूळवार 24 सप्टेंबर आंदोलनाच्या दुस-या दिवषी जिल्हाभरातुन सावरगांव डुकरे कडे हजारो शेतकरी आंदोलन स्थळी आले. काही काळ आंदोलन (Farmer Andolan) मंडपात बसल्यानंतर रक्ताच्या सहीने शेतकरी पाठींबा देत असल्याने अन्नत्याग केल्यावरही एक नवी उर्जा मिळत आहे.
रक्ताच्या सहीने देत शेतकरी देत असलेला पाठींबा लढण्यास बळ देणारा: राहुलभाउ बोंद्रे
शेतकरी त्यांच्या मागण्यांचे रक्ताचे निवेदन जिल्हा प्रषासनाने फाडल्याने संतप्त भावना व्यक्त करून मला लढण्यास बळ देत असल्याचे सांगुन गृहमंत्री व पोलीस प्रषासनाने त्यांच्या केलेल्या शेतकरी विरोधी कृत्यासाठी माफी मागेपर्यंत हे बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरूच राहील असे जिल्हा कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुलभाउ बोंद्रे यांनी सांगितले. तर महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री तथा प्रदेष कॉग्रेसचे माजी अध्यक्ष माणिकराव ठाकरे हे आज बेमुदत अन्नत्याग आंदोलन कर्त्यांच्या भेटीसाठी सावरगांव डुकरे येथे येणार आहे.
आंदोलनाच्या (Farmer Andolan) दुस-या दिवषी हजारो शेतक-यासह महाविकास विकास आघाडीच्या पदाधिका-यांनी सावरगांव डुकरे येथे जावुन बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला पाठींबा दिला आहे. याप्रसंगी षिवसेना उबाठा नेते प्रा.नरेंद्र खेडेकर हे आंदोलनाला पाठींबा देत म्हणाले षिवसेना प्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे हे मुख्यमंत्री असतांना राज्यातील शेतक-यांचे 2 लाख रूपया पर्यंतचे कर्जमाफ झाले होते. मात्र सध्याच्या शेेतक-यांना कसलीही कर्जमाफी दिली नाही. हे सरकार शेतकरी विरोधी असल्याचे सांगुन सरकार विरूध्द विविध टिकास्त्रे यावेळी त्यांनी दागली. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्षा माजी आमदार रेखाताई खेडेकर म्हणाल्या ज्या सरकारला शेतक-याबध्दल धोडी सहानुभूती नाही त्यांना सत्तेत राहण्याचा कसलाच अधिकार नाही, आणि ज्या पोलीस अधिका-यांनी शेतक-यांच्या निवेदन फाडले त्यांच्यावर ताबडतोब सक्त कारवाई झाली पाहीजे अषी भुमीका यावेळी व्यक्त केली.
आदर्ष ग्राम सावरगांव डुकरे येथील अन्नत्याग आंदोलन (Farmer Andolan) मंडपास प्रदेष कॉग्रेसचे सरचिटणसी अॅड. गणेषराव पाटील, श्यामभाउ उमाळकर, विजुभाउ आंभोरे, प्रदेष कॉग्रेसच्या सचिव अॅड. जयश्री शेळके, जिल्हा उपाध्यक्ष शेैलेष सावजी, कॉग्रेस जेष्ठनेते लक्ष्मणराव घुमरे, अॅड अनंत वानखेडे, राजश्री शाहु परीवाराचे संदिप शेळके, चिखली तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष सतिष भुतेकर, बुलडाणा तालुका सरपंच संघटनेचे तालुका आध्यक्ष दादा लवकार, रॉ.कॉ.चे तालुका अध्यक्ष दिपक म्हस्के, उबाठा तालुका अध्यक्ष श्रीकिसन धोंडगे, प्रा. संतोष आंबेकर आणि सौ. मिनलताई आंबोकर, लोणारचे माजी नगराध्यक्ष भुषन मापारी, जि.प.सदस्या ज्योतीताई खेडेकर, मलकापुरचे नगराध्यक्ष अॅड.हरीष रावळ, षिवसेना उपजिल्हाप्रमुख कपिल खेडेकर, शहर प्रमुख श्रीराम झोरे, युवासेनेचे नंदु क-हाडे, उपजिल्हाप्रमुख अषिष रहाटे, मेहकर तालुका अध्यक्ष देवानंद पवार यांच्यासह अन्नत्याग मंडपास भेट देवुन माजी आमदार राहुलभाउ बोंद्रे व शेतक-यांच्या या आदोलनाला आपल्या रक्ताच्या स्वाक्षरी देवुन उस्फुतपणे पाठींबा दर्षवीत आहे.
बुलडाणा व चिखली तालुका सरपंच संघटनेचा पाठींबा
बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला (Farmer Andolan) जिल्हाभरातुन उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. चिखली तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष सतिष पाटील भुतेकर व बुलडाणा तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष दादा लवकार यांनी सर्व सरपंचाच्या वतीने शेतक-यांच्या अन्नत्याग आंदोलनाला पाठींबा देणारे पत्र राहुलभाउ बोंद्रे यांना दिले आहे. तर अमडापुर सरपंच सौ.वैषाली गवई यांनी अमडापुर पोलीस स्टेषनला निवेदन देवुन रक्ताचे निवेदन फाडणा-या पोलीस अधिकारी व कर्मचा-यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
आंदोलनाला आज माणिकराव ठाकरे भेट देणार
शेतक-यांच्या रक्ताच्या अपमानाबध्दल राज्यभरातुन तिव्र संताप उमटत असुन महाविकास आघाडीच्या नेते,पदाधिका-यांनी पोलीस प्रषासनाचा तसेच सरकारचा निषेध केला आहे. बुधवार दि. 25 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री तथा प्रदेष कॉग्रेसचे माजी अध्यक्ष माणिकराव ठाकरे हे आज बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला (Farmer Andolan) भेट देवुन पाठींबा देणार आहे.