रिसोड (Risod):- वाशिम जिल्हा शेतकरी आत्महत्याग्रस्त(Suicidal) मुक्त करणे व तसेच बालविवाह रोखणे याची प्रभावी अंमलबजावणी करण्याकरिता नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन वाशिम जिल्हाधिकारी बुवनेश्वरी यांनी केले आहे. ते आज दिनांक 13 मे रोजी दुपारी एक वाजता रिसोड तहसील कार्यालय सभागृहामध्ये आयोजित शेतकरी आत्महत्त्या मुक्त जिल्हा अभियान, शेतकरी आत्मबळ प्रशिक्षण(Self-reliance training) कार्यक्रमात मार्गदर्शन करताना बोलत होत्या.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की बालविवाह साठी नेहमी मुलींना दोष देण्यात येत असतो मात्र दोष फक्त मुलींचाच नसतो तर मुली ह्या मजबुरीने किंवा लालसापोटी बालविवाह करत असतात. अठरा वर्षे वय झाल्यानंतरच मुलींचे लग्न करावे कारण ती 18 वर्षे वय झाल्यानंतर ती लग्नास योग्य होते व संसारासाठी तिची मानसिकता व शरीर दृढता निर्माण झालेले असते. बालविवाह (child marriage) रोखण्यासाठी सर्व स्तरावरून सामान्य नागरिकांनी सुद्धा प्रशासनास सहकार्य करावे यासाठी १०९८ हा टोल फ्री क्रमांक शासनाने जारी केला असून यावर कोणीही बालविवाहासाठी तक्रार करू शकतो. यासाठी संबंधित व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवण्यात येतात. येणाऱ्या काळात वाशिम जिल्हा हा शेतकरी आत्महत्या व बालविवाह यासाठी निरंक राहणार आहे प्रशासनाकडून यासाठी विविध उपाय योजना आखलेल्या असून सर्वाच्या सहकार्याने हे शक्य होऊ शकते.
जिल्ह्यातील शेतकरी नानाविध आडचणीचा सामना करतांनी अनेक शेतकरी कुटुंबातील सदस्यांनी आत्महत्त्या सारखा मनाला वेदना देणारा मार्ग अवलंबीला यामध्ये अनेक शेतकरी कुटुंबाची वाताहत झालेली आहे. आशा बिकट परिस्थितीतुन धेर्याच्या मार्गाचा सामना करणा-या शेतकरी कुटुंबांना आत्मबळ प्रशिक्षणाचे आयोजन वाशिम जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांच्या कल्पनेतुन रिसोड तहसील कार्यालयामध्ये 13 मे रोजी संपन्न झाला. कार्यक्रमाची प्रास्ताविक तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी केले. या आत्मबळ प्रशिक्षणा मध्ये मनोविकारतज्ज्ञ डाॅ.श्वेता मोरवाल ह्या शेतकरी (Farmer)आणि आत्मबळ उन्नती, शेती उत्पादन खर्च कमी करणे या विषयावर जैविक शेतीचे प्रशिक्षक संजय मांडवगडे मार्ग दर्शन केले. तर पिक पध्दती या विषयावर रिसोड तालुका कृषी अधिकारी (Agricultural Officer) मदन तावरे यांनी मार्गदर्शन केले.
पिक कर्ज व्याजमाफी, पुनर्गठण योजने संदर्भात शेतक-यांना मार्गदर्शन स्टेट बॅंक (State Bank) चे शाखा व्यवस्थापक राहुल बारापात्रे, शेती संबंधित कौशल्य विकास यावर जिल्हा कौशल्य विकास अधिकारी श्रीमती सिमा खिरोडकर,बालविवाह प्रतिबंध उपाययोजना या विषयावर कायदा तथा परिवीक्षा अधिकारी जिनसाजी चौधरी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बदरखे न्याय तहसीलदार दराडे न्याय तहसीलदार कुळमेथे सरपंच उपसरपंच पोलीस पाटील तलाठी आशा सेविका शेतकरी आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालन शिवकन्या कोतीवार तलाठी, आभार प्रदर्शन बाळासाहेब दराडे नायब तहसीलदार यांनी केले.