बुलढाणा (MLA Sanjay Gaikwad) : सरकार मदत करेल तेव्हा करेल, पण येत्या शनिवारीच कोळपणीचे जू खांद्यावर घेतलेल्या “त्या” शेतकऱ्याला स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून आ. संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) बैलजोडी घेऊन देणार आहेत. यासंदर्भात त्यांनी लातूर जिल्ह्यातील शेतकरी अंबादास पवार (Farmer Ambadas Pawar) यांच्याशी फोनवरून संवाद साधून दोन दिवसात चांगली बैलजोडी पाहून ठेवा, मी शनिवारी येऊन तुम्हाला ती घेऊन देतो.. अशी ग्वाही दिली आहे. ज्या वयात खांद्यावर नातवंड खेळवायची त्या वयात सदर शेतकऱ्याच्या खांद्यावर औताचे जू उडण्याची वेळ आल्यामुळे व्यथीत झालेल्या आ. संजय गायकवाड यांनी हा निर्णय मुंबईत माध्यमांशी बोलताना बोलून दाखविला.
मुंबई येथे सध्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असून, या अधिवेशनात काल बुधवार २ जुलै रोजी लातूर तालुक्यातील (Farmer Ambadas Pawar) एका शेतकऱ्याचा व्हिडिओ विरोधी पक्षांनी दाखविल्यामुळे एकच खळबळ उडाली. शेतकऱ्यांच्या या अवस्थेमुळे सरकारची लक्तरे विषयावर टांगल्या गेली. मात्र यामुळे मुळात शेतकरी असणारे बुलढाणा विधानसभा मतदार संघाचे आमदार संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांनी असे सर्व प्रकार यामुळे भोगल्याने तातडीने त्यांनी अंबादास पवार (Farmer Ambadas Pawar) या शेतकऱ्यांशी संपर्क साधून चांगली बैलजोडी पाहून ठेवण्याच्या सूचना केल्या. येत्या शनिवारी मी तुमच्या गावात येऊन सदर बैलजोडी तुम्हाला घेऊन देतो, असे त्यांच्याशी बोलणे झाल्याचे आ. गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
लातूर जिल्ह्यातील हाडोळती (ता. अहमदपूर) येथील अंबादास गोविंद पवार या ७६ वर्षीय वृद्ध शेतकऱ्याचं जीवन उघडंनागडं होतं.. बैल नव्हते, तरीही पत्नीसमवेत स्वतःच्या खांद्यावर नांगर घेत ते शेत नांगरत होते. हा हृदयद्रावक क्षण संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला आणि अनेकांच्या डोळ्यांत अश्रू आले. या दृश्यावर अनेकांनी सहानुभूती व्यक्त केली; पण बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार धर्मवीर संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांनी केवळ सहानुभूती न दाखवता थेट कृतीतून आपली माणुसकी जपली. संजुभाऊंनी अंबादास काकांशी (Farmer Ambadas Pawar) थेट फोनवर संवाद साधत त्यांच्या हालअपेष्टा समजून घेतल्या आणि त्वरित निर्णय घेतला. “शनिवार, ६ जुलै २०२५ रोजी सकाळी १० वाजता हाडोळती गावात पोहोचून त्यांना स्वतः बैलजोडी भेट देणार आहे,” असं त्यांनी सांगितलं. यासोबतच, शेतीसाठी लागणारे इतर साहित्य आणि गरजा याही पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं.
“मी सुद्धा अशा प्रसंगातून गेलोय. बैलाच्या मरण्यानंतर मी देखील स्वतः खांद्यावर जोत घेऊन शेती केलीय. म्हणूनच अंबादास काकांचं दुःख मला खूप जवळचं वाटतं…” असे शब्द आ. संजुभाऊ गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांनी सांगून लोकांच्या काळजाला हात घातला. राजकीय नेत्यांमध्ये जबाबदारीची भावना कधी कधी हरवते. पण या घटनेने सिद्ध केलं की माणुसकी अजूनही जिवंत आहे, आणि ती संजुभाऊसारख्या लोकप्रतिनिधींमध्ये झळकते.