महावितरणच्या गलथान कारभाराने घेतला निरपराध जीव
नेर तालुक्यातील चिंचगाव येथे हृदयद्रावक घटना; गावात शोककळा पसरली
नेर (Farmer Death Case) : दिवाळीच्या शुभ पर्वावर धनत्रयोदशीच्या दिवशी आनंदाचे वातावरण असताना, नेर तालुक्यातील चिंचगाव येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेने गाव शोकमग्न झाले आहे. महावितरणच्या गलथान कारभारामुळे लोंबकळत असलेल्या वीजतारेच्या संपर्कात आल्याने शेतकर्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी सुमारास आठ वाजता घडली. (Farmer Death Case) मृत शेतकरी सिद्धेश्वर देविदासआप्पा तंबाखे (वय ६०) असे असून, ते चिंचगाव येथील रहिवासी आहेत. त्यांच्याकडे अडीच एकर शेती असून सोयाबीन पिकावर त्यांची उपजीविका अवलंबून होती.
साधे, शांत स्वभावाचे आणि परिश्रमी म्हणून सिद्धेश्वर तंबाखे गावात परिचित होते. दिवाळीच्या दिवशी आनंद व्यक्त करायचा असताना, त्यांच्या मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.घटनेचे वृत्त असे की, सकाळी आठ वाजता ते आपल्या शेतातील सोयाबीन पिकाची पाहणी करण्यासाठी गेले असता, सचिन तोरकडी यांच्या शेताजवळ महावितरणच्या दुर्लक्षामुळे लोंबकळत असलेली वीजतार खाली पडली होती. त्या तारेला पाय लागल्याने सिद्धेश्वर तंबाखे यांना तीव्र करंट बसला आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर परिसरात प्रचंड संताप व्यक्त होत असून, गावातील नागरिकांनी महावितरणच्या विरोधात घोषणाबाजी केली. गावातील नागरिकांसह उपसरपंच पद्माकर राऊत आणि सुनील खाडे यांनी या (Farmer Death Case) घटनेची चौकशी करून मृत शेतकर्याच्या कुटुंबाला न्याय मिळावा, तसेच जबाबदार अधिकार्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. नेट तालुक्यातील चिंचगावसह अनेक ठिकाणी वीजतारा लोंबकळलेल्या स्थितीत असल्याचे वारंवार निदर्शनास येत आहे. रोहित्रे सुद्धा उघडी असल्याने शेतकरी आणि नागरिकांच्या जीवाला कायमचा धोका निर्माण झाला आहे. तरीही महावितरणकडून कोणतीही ठोस उपाययोजना होत नसल्याने नागरिकांचा संताप वाढत चालला आहे.
महावितरण कार्यालयात प्रेत घेऊन संतप्त नागरिकांचा आक्रोश
घटनेनंतर संतप्त गावकर्यांनी मृत शेतकर्याचे प्रेत घेऊन थेट महावितरण कार्यालयावर धडक दिली. त्यांनी जबाबदार अधिकार्यांविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला. अखेर पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर वातावरण शांत झाले. पोलिसांनी प्रेत ताब्यात घेऊन ते ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनाकरिता पाठवले.धनत्रयोदशीच्या दिवशी घडलेल्या या हृदयद्रावक घटनेमुळे चिंचगाव गावात शोककळा पसरली असून, महावितरणच्या गलथान कारभारावरून प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.