माहूर/Nanded (farmer death) : शेतात सपिंकलर चे पाईप गोळा करीत असताना अचानक वीज कोसळल्याने शेख फरीद वझरा येथील १८ वर्षीय तरुण शेतकऱ्याचा (farmer death) दुर्दैवी मृत्यू झाला.ही घटना दि १७ रोजी घडली. शेख फरीद वझरा येथील तरुण शेतकरी आनंद तुकाराम मुंडे वय १८ हा आपल्या शेतात स्पिकलर गोळा करीत होता.अचानक जोरदार वारा व विजेचा कडकडाट होऊन त्याच्या अंगावर वीज कोसळली यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
घटनेची (farmer death) माहिती मिळताच तलाठी ए.वी. कुडमेथे व माहूर पोलीस ठाण्याचे जमादार बाबू जाधव, दत्त मांजरी येथील पोलीस पाटील रितेश केंद्रे, यांनी घटना स्थळी भेट देऊन पंचनामा केला,या वेळी सरपंच दीपक केंद्रे, हरीश मुंडे, हनुमंत मुंडे, सुनील फड, प्रभू चोले, बालाजी केंद्र या गावकऱ्यांच्या मदतीने मृतदेह माहूर येथील ग्रामीण रुग्णालयात (hospital) शोविच्छेदनासाठी (postmortem) आणण्यात आला. आनंद तुकाराम मुंडे वय १८ यांच्या दुर्दैवी निधनाने शेख फरीद वझरा व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.